नऊवारी नेसून स्काय डायव्हिंग! पुण्याच्या शीतल महाजन यांचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:44 AM2018-02-13T05:44:50+5:302018-02-13T05:44:59+5:30
भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून, तब्बल १३ हजार फुटावरून विमानातून उडी घेऊन सोमवारी सकाळी नवा विक्रम नोंदविला.
पुणे : भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून, तब्बल १३ हजार फुटावरून विमानातून उडी घेऊन सोमवारी सकाळी नवा विक्रम नोंदविला.
शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग (पॅराजम्पर) या साहसी खेळात आतापर्यंत १७ राष्ट्रीय व ६ जागतिक विक्रम केले आहेत. मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच मराठी बाणा कायम राहावा, याकरिता नऊवारी साडी परिधान करून त्यांनी हा विक्रम केला.
बहिणाबार्इंची पणती
शीतल यांचा जन्म पुण्यात झाला असून, त्यांचे मूळ गाव जळगाव आहे. थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या त्या पणती आहेत. बहिणाबार्इंचे नातू कमलाकर महाजन यांच्या त्या सुकन्या.
सातही खंडांवरून पॅराशूट जम्प
जगातील सातही खंडांतील विविध ठिकाणांवर त्यांनी स्काय डायव्हिंग केले आहे. उत्तर ध्रुव (आर्क्टिक)
आणि दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका) आणि
भारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन, आॅस्ट्रेलिया, युरोप, साउथ आफ्रिका, साउथ अमेरिका येथे त्यांनी पॅराशूट जम्प केलेल्या आहेत.
शीतल यांनी रिझोना येथे १० तासांचे व्हर्टिकल विन्ड टनलमध्ये ट्रेनिंग घेतले आहे.
- 7000 हून अधिक वेळा पॅराशूट जम्पिंग.
- एक पॅराशूट जम्प आॅक्सिजनच्या सहाय्याने तब्बल ३० हजार फुटांवरून केले आहे.