राष्ट्रवादीमधील सुंदोपसुंदी पुन्हा उघड

By admin | Published: May 17, 2014 06:02 AM2014-05-17T06:02:10+5:302014-05-17T06:02:10+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पाचही आमदार शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यामुळे या एकत्रित ताकदीपुढे आढळराव एकाकी पडल्याचे चित्र होते.

In the NCP, | राष्ट्रवादीमधील सुंदोपसुंदी पुन्हा उघड

राष्ट्रवादीमधील सुंदोपसुंदी पुन्हा उघड

Next

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पाचही आमदार शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यामुळे या एकत्रित ताकदीपुढे आढळराव एकाकी पडल्याचे चित्र होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही राष्टÑवादी कॉँग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम केले नाही, असे बोलले जात आहे. देवदत्त निकम यांना उमेदवारी देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाचही आमदारांवर याची जबाबदारी सोपविली होती. मताधिक्य मिळाले नाही तर विधानसभेच्या उमेदवारीच्या वेळी विचार करू, असेही सांगितले होते. मात्र, येथेच घात झाला, असे कार्यकर्ते आता सांगत आहेत. प्रत्येकच मतदारसंघातील विधानसभेसाठीच्या इच्छुकांनी बदल घडण्याची संधी म्हणून कामच केले नाही. त्याचे खापर आमदारांच्या माथ्यावर फोडले जाईल, यासाठीच प्रयत्न केले. त्यामुळेच राष्टÑवादीमधील ही सुंदोपसुंदी आणि मोदीलाटेवर स्वार झालेल्या शिवाजीराव आढळराव यांचा विजय अधिक सोपा झाला. भोसरी, हडपसर, जु न्नर, आंबेगाव, शिरूर, खेड-आळंदी या सहाही लोकसभा मतदारसंघातून आढळराव यांनी मताधिक्क्य मिळविले. भोसरी मतदारसंघातून आढळरावांनी सर्वाधिक ८४ हजार ६०२ मतांचे मताधिक्क्य मिळाले. त्यापाठोपाठ खेड-आळंदी, हडपसर, शिरूर, जुन्नर मतदारसंघातून मताधिक्क्य मिळाले. आंबेगाव मतदारसंघामध्ये त्यांना १८ हजार ५८३ मतांचे मताधिक्क्य मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत आढळराव यांना १ लाख ७८ हजारांचे मताधिक्क्य मिळाले होते, त्यामध्ये त्यांनी यंदा १ लाख २३ हजारांनी वाढ झाली. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांना ३६ हजार ४३१ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे सर्जेराव वाघमारे यांना १९ हजार ७१९ मते मिळाली तर आम आदमी पार्टीचे सोपान निकम यांना १६ हजार ६५७ मते मिळाली. यंदा पहिल्यांदाच नकाराधिकार नोंदविता येणार होता, ११ हजार ९८८ मतदारांनी या अधिकाराचा उपयोग केला.

Web Title: In the NCP,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.