'जयदेवी जयदेवी जय कमळाबाई', पुण्यात आरती करून गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 02:48 PM2022-05-11T14:48:20+5:302022-05-11T14:55:17+5:30
गॅस दरवाढीविरोधात शनिपार मंदीर ( मंडई जवळ) येथील हनुमानास साकडे घालून व महाआरती करून प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले.
पुणे : पुण्यात मोदी सरकारने केलेल्या अन्यायकारक गॅस दरवाढीविरोधात शनिपार मंदीर ( मंडई जवळ) येथील हनुमानास साकडे घालून व महाआरती करून प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. मोदी सरकार हाय हाय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. जयदेवी जयदेवी जय कमळाबाई अशी आरती प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी सादर केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सदर आंदोलन यापुढे संपुर्ण महाराष्ट्रात ही महागाईची आरती म्हणून पक्षााच्या वतीने गॅस व इंधन दरवाढीची आंदोलने होतील असे जाहीर केले.
प्रदीप देशमुख यांची आरती
जयदेवी जयदेवी जय कमळाबाई
महागाई असह्य होई जेंव्हा तु राज्यावर येई …..
जयदेवी जयदेवी
||जय कमळा बाई ||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी, जय देवी जयदेवी |१|
अदानी -अंबानी चं तुझे पिता
गरीबांची कर्दनकाळ तु
नफाखोरांची त्राता ….
जयदेवी जयदेवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी जय देवी जयदेवी |२|
झोलावाल्या फ़क़ीराचे चे तू विश्वदर्शन करवीशी
सामान्यांच्या इंधनातदरवाढ करशी
जयदेवी जयदेवी
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी |३|
त्रिलोकी तुझ्या भ्रष्टाचाराच्या
गाथा
भारतीय आता पिटतायत आपलाच माथा
जय देवी जय गवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी |४|
जेव्हा भाजप मुक्त होशील भारतदेशा, तेव्हाच पुर्ण होतील तुझ्या सगळ्या आशा
जय देवी जय देवी
||जय कमळाबाई||
जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी जयदेवी जयदेवी |५|
पुण्यात मोदी सरकारने केलेल्या गॅस दरवाढीविरोधात आंदोलन #Pune#centralgovernmentpic.twitter.com/0KRoLPfoBi
— Lokmat (@lokmat) May 11, 2022