Video: "महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो", पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 03:09 PM2022-02-09T15:09:01+5:302022-02-09T15:12:23+5:30

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला' असे विधान केले होते

ncp agitation in pune from narendra modi statement | Video: "महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो", पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Video: "महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो", पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Next

पुणे : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला' असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत असून राज्यातील कानाकोपऱ्यात नरेंद्र मोदींचा निषेध केला जात आहे. पुण्यातही राष्ट्रवादी काँगेसने त्या विधानविरोधात आंदोलन केले आहे. ''महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो, मोदी हाय हाय'' अशी घोषणाबाजी करत मोदींचा जाहीर निषेध केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.    

''पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी देऊन रयतेचे कल्याण करण्यासाठी प्रेरित करा. खरा राजधर्म शिकण्याची संधी देण्यासाठी माफ करा असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराज यांच्यापुढे मांडण्यात आले.''

देशातील जनता येत्या काळात भाजपला धडा नक्की शिकवणार 

ज्यांनी आयुष्यभर केवळ द्वेषाचं राजकारण केलं ते आजही दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन राज्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात उभी फूट पडणारा पंतप्रधान या देशाने कधीच बघितला नव्हता जो आज आपण नरेंद्र मोदींच्या रुपात बघत आहोत. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्राचा अवमान करून नरेंद्र मोदींनी त्यांच्या बलिदानाचाही अवमान केला आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही नरेंद्र मोदींच्या गुलामगिरीत गुंग असल्याने त्यांनाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील, देशातील जनता येत्या काळात भाजपला धडा नक्की शिकवणार अशी संतप्त भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

यावेळी सौ. दिपाली धुमाळ, प्रवक्ते श्री. प्रदीप देशमुख सौ. मृणालिनीताई वाणी, श्री. किशोर कांबळे, शशिकलाताई कुंभार,  कार्तिक शिंदे, पूनम पाटील , सुवर्णा सावर्डे, किरण कद्रे, श्वेता मिस्त्री, प्रीती धोत्रे, राखी श्रीराव, सानिया झुंजारराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .  

Web Title: ncp agitation in pune from narendra modi statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.