राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेने ग्रामपंचायती राखल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:22+5:302021-01-19T04:13:22+5:30

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निकाल पहाता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला आपल्याकडे यापुर्वी असलेल्या ग्रामपंचायती राखण्यात यश ...

NCP and Shiv Sena retained Gram Panchayats | राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेने ग्रामपंचायती राखल्या

राष्टवादी काँग्रेस व शिवसेनेने ग्रामपंचायती राखल्या

Next

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निकाल पहाता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला आपल्याकडे यापुर्वी असलेल्या ग्रामपंचायती राखण्यात यश आले. मंचर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने सत्ता मिळवली. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना करत आहे.

आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी कारेगाव, चिंचोली, भराडी व साकोरे या चा ग्रामपंचायती यापुर्वी बिनवीरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत २५ ग्रामपंचायतींमध्ये १७५जागेंसाठी ३६६ उमेदवार उभे होते. यामध्ये गावडेवाडी, पिंगळवाडी-लांडेवाडी, कोळवाडी-कोटमदरा, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापुर, शिंगवे, गिरवली, शेवाळवाडी, खडकवाडी, भागडी, एकलहरे, खडकी, पेठ, महाळुंगे पडवळ, वळती, थुगांव, काळेवाडी-दरेकरवाडी, रानमळा, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोलदरा-गोनवडी, अवसरी खुर्द यांची मतमोजणी घोडेगाव येथे तहसिल कार्यालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी काम पाहिजे. मतमोजणी पुर्वी तहसिलदार रमा जोशी यांनी उपस्थित उमेदवार, प्रतिनिधी व कर्मचारी यांना गोपनीयतेची शप्पथ दिली.

चौकट

आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या एकंदरीत निकालावर आम्ही समाधानी आहोत. तालुक्यात २९ पैकी १६ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या तर ८ ग्रामपंचायती शिवसेनेकडे राहिल्या. ५ ग्रामपंचायती स्थानिक पातळीवरील आघाडांमध्ये राहिल्या. महाळुंगे पडवळ जरी शिवसेनेकडे गेली असली तरी थुगांव, गावडेवाडी आमच्या कडे आली. मंचर प्रमाणे ज्या ठिकाणी महाविकास आघाडी लढली तेथे गावांचा फायदा झाला. प्रत्येक निवडणूकीत होणारे वादविवाद तंटे या निवडणूकीत झाले नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे यांनी सांगितले.

चौकट

शिवसेनेचे वर्चस्व मंचर, खडकवाडी, शेवाळवाडी, महाळुंगे पडवळ, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, साकोरे, काळेवाडी-दरेकरवाडी, पेठ, कारेगांव, थुगांव, चिंचोली, लौकी, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोलदरा-गोनवडी, जवळे या ग्रामपंचायतींवर राहिले आहे. तर महाविकास आघाडी वळती, मंचर, एकलहरे, गावडेवाडी मध्ये राहिली आहे. यापुर्वी आमच्याकडे नसलेली महाळुंगे पडवळ सारखी मोठी ग्रामपंचायत शिवसेनेकडे आली. राष्ट्रवादीकडे सत्तास्थाने असतानाही शिवसेनेने चांगले यश मिळवीले. या निकालावर आम्ही समाधानी आहोत. मंचर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येवून १७ पैकी १६ जागा मिळवल्या. मंचर ग्रामपंचायतीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने गावाच्या विकासाला फायदा होईल असे शिवसेना तालुका प्रमुख अरूण गिरे यांनी सांगितले.

चौकट

आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल पहाता भाजपाचे मतदान वाढले आहे. यापुर्वी भाजपाचे उमेदवार मिळत नव्हते. मात्र, या निवडणूकीत आम्ही उमेदवार देऊ शकलो. गिरवली, पेठ, थुगांव, कारेगांव, चिंचोली या ग्रामपंचातयींमध्ये आम्ही भाजपाचे उमेदवार निवडूण आणले आहेत. मंचर ग्रामपंचायतमध्ये आम्ही तीस टक्के मते मिळवली. यातील वार्ड क्रं.५ मध्ये चुरशीची लढत दिली अशी प्रतिक्रीया भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे यांनी दिली.

चौकट

मंचरमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी म्हणजे ‘हम तुम, मिलके बाट खायेंगे’ यासाठी एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष आहेत. तालुक्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या ताकदीमध्ये आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनासंधी मिळाली नाही. तसेच या दोघांच्या दबाव तंत्रामूळे आम्हाला उमेदवार मिळाले नाहीत. परंतू या परभावातून पुन्हा कामाला लागू व आंबेगाव तालुक्यात काँग्रेस आयचे स्थान बळकट करू असे काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष राजु इनामदार यांनी सांगितले.

फोटो: घोडेगाव तहसिल कार्यालया बाहेर मतमोजणीनंतर जल्लोष साजरा करताना कार्यकर्ते

गिरवली ता.आंबेगाव ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार.

Web Title: NCP and Shiv Sena retained Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.