Rupali Patil: राष्ट्रवादी काँग्रेसने रूपाली पाटील यांच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:24 PM2022-05-31T22:24:24+5:302022-05-31T22:34:17+5:30

Rupali Patil: मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतरही रूपाली पाटील या कायमच चर्चेत राहिल्या आहेत.

ncp appointed rupali patil thombare as vice president of pune city | Rupali Patil: राष्ट्रवादी काँग्रेसने रूपाली पाटील यांच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर नियुक्ती

Rupali Patil: राष्ट्रवादी काँग्रेसने रूपाली पाटील यांच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर नियुक्ती

Next

पुणे: गेल्या काही महिन्यांपूर्वी मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांच्यावर विश्वास दर्शवत पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक आक्रमक चेहरा म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. अन्य पक्षांकडून होणाऱ्या टीकेला रुपाली पाटील जशास तसे प्रत्युत्तर देताना दिसतात. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात आली. त्यावेळी रुपाली पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता रूपाली पाटील यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रूपाली पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

वकील असलेल्या रूपाली पाटील यांना पक्षाकडून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने आपल्या पक्षाची विचारधारा आणि तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटन वाढवण्यासाठी आपण यशस्वी वाटचाल कराल व आपल्या सक्षम कृतीतून जनसामान्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा उत्तरोत्तर अधिक उज्ज्वल कराल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. 

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू

मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर रूपाली पाटील या नेहमीच चर्चेत राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनातील एक आक्रमक चेहरा म्हणून रूपाली पाटील यांच्याकडे पाहिले जाते. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून, त्यानंतर लगेचच रूपाली पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देऊन निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या सहीने रुपाली पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये येण्यापूर्वी रूपाली पाटील ठोंबरे या मनसेमधील एक आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या. मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत होत्या. तरुण-तरुणी महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम केले. पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. सन २०१७ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी गरोदर असून गल्लीबोळात प्रचार करून त्यांनी राज्याचे लक्ष वेधले होते. मात्र दरम्यानच्या काळात काही मतभेदानंतर त्यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रूपाली पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश मनसेसाठी मोठा धक्का मानला जातो.
 

Web Title: ncp appointed rupali patil thombare as vice president of pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.