राष्ट्रवादीचा महागाईविरोधात हल्लाबोल : राजगुरुनगरला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 02:13 AM2017-11-30T02:13:45+5:302017-11-30T02:13:45+5:30

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतीमालाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव कमी होण्याबाबत सरकारच्या विरोधात मंगळवार (दि.२८) रोजी तहसीलदार कचेरीसमोर महागाई विरोधात जोरदार हल्लाबोल आंदोलन केले.

 NCP attacks against inflation: Rajgurunagar agitation | राष्ट्रवादीचा महागाईविरोधात हल्लाबोल : राजगुरुनगरला आंदोलन

राष्ट्रवादीचा महागाईविरोधात हल्लाबोल : राजगुरुनगरला आंदोलन

Next

राजगुरुनगर : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतीमालाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव कमी होण्याबाबत सरकारच्या विरोधात मंगळवार (दि.२८) रोजी तहसीलदार कचेरीसमोर महागाई विरोधात जोरदार हल्लाबोल आंदोलन केले.
तालुक्यातील सर्वसामान्य माणूस, कामगार, व्यापारी, शेतकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक इत्यादी नागरिकांसह सर्व घटकांची आर्थिक घडी ढासळल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शेतीमालाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. आपल्या न्याय्य मागण्या मांडण्यासाठी व या निष्क्रिय सरकारचा निषेध माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
राजगुरुनगर एसटी स्टँड येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली.
कर्जमाफी करताना शेतकºयांची पिळवणूक या सर्वच बाबतीत सरकारचे चुकीचे धोरण व निर्णय यामुळे जनता पूर्णपणे हतबल झाली असल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, तालुका महिला अध्यक्षा साळूबाई मांजरे, परिषद सदस्या निर्मला पानसरे, दीपाली काळे, अरुण चांभारे, विलास कातोरे, राजाराम लोखंडे, राहुल नायकवडी, वैभव घुमटकर, विलास मांजरे, प्रकाश कुºहाडे, अरुण चौधरी, शांताराम सोनवणे, सुरेखा मोहिते, वैशाली गव्हणे, बाळासाहेब सांडभोर, धैर्यशील पानसरे, विनायक घुमटकर, सुरेश शिंदे, मंगल चांभारे, नंदाताई सुकाळे, मंदा शिंदे, अनिता हळये, उमा शेटे, अशोक मांजरे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणतीही दखल नाही

गेल्या ३ वर्षांत राज्यामधल्या शेतकºयांच्या प्रश्नावर आंदोलने होऊनही सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. वाढती महागाई, पेट्रोल व डिझेलची दरवाढ, भरमसाट वाढलेले वीजबिल, घरगुती स्वयंपाकाचा गॅसची दरवाढ, वाढती बेरोजगारी, शेतक-यांच्या शेतीमालाला नसलेला भाव, बंद पडत चाललेले उद्योगधंदे, ‘जीएसटी’मुळे वाढलेली प्रचंड करवाढ, सर्वच ठिकाणी कामगारविरोधी धोरण,, सहकारविरोधी धोरण, नोटाबंदीचा फसलेला निर्णय.

Web Title:  NCP attacks against inflation: Rajgurunagar agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.