आंबाडे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी-काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:40+5:302021-01-21T04:10:40+5:30

भोर- मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडे ग्रामपंचायतीवर मागील १५ वर्षांपासून मुंबई बाजार समितीचे माजी संचालक प्रदीप खोपडे यांची सत्ता होती. मात्र ...

NCP-Congress flag on Ambade Gram Panchayat | आंबाडे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी-काँग्रेसचा झेंडा

आंबाडे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी-काँग्रेसचा झेंडा

googlenewsNext

भोर- मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडे ग्रामपंचायतीवर मागील १५ वर्षांपासून मुंबई बाजार समितीचे माजी संचालक प्रदीप खोपडे यांची सत्ता होती. मात्र तीन-चार वर्षांपूर्वी खोपडे यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या आंबाडे ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून निवडणूक लढवली तर प्रदीप खोपडे यांनी भाजपाचे पॅनेल उभे केले होते. एवढेच नाही तर स्वत:ही निवडणुकीच्या मैदानात उरतले. मात्र मतदारांनी ७ पैकी ७ जागा काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या पॅनलने घेत एकहाती सत्ता मिळवली. तर प्रदीप खोपडे यांच्या भाजपच्या पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे १५ वर्षाची ग्रामपंचायतीवरची प्रदीप खोपडे यांची सत्ता संपुष्टात आली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्रित आघाडी करुन सर्व ७ उमेदवार उभे करुन परिवर्तन करण्यासाठी जोरदार प्रचार केला होता. तर प्रदीप खोपडेही ग्रामपंचायत पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करित होते.मात्र अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सर्व ७ जागा काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने जिंकून एकहाती सत्ता मिळवून परिवर्तन घडवून आणले. प्रदीप खोपडेचा ४ मतांनी पराभव करुन ज्ञानेश्वर खोपडे जाॅईंट किलर ठरले आहेत.

विजयी उमेदवार:

कविता मनोज खोपडे, प्रमोद पोपट सपकाळ, सुरेखा शामराव रांजणे, माधुरी शिवाजी खोपडे, गीता प्रसन्न उल्हाळकर, ज्ञानेश्वर कृष्णा खोपडे, हेमलता मिलिंद खोपडे,

२० भोर आंबाडे

Web Title: NCP-Congress flag on Ambade Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.