खेड गणात राष्ट्रवादीचा पराभव
By admin | Published: August 30, 2016 01:49 AM2016-08-30T01:49:52+5:302016-08-30T01:49:52+5:30
हवेली तालुक्यातील खेड पंचायत समिती गणात झालेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात असलेल्या जागेवर शिवसेनेने विजय मिळविला आहे.
पुणे : हवेली तालुक्यातील खेड पंचायत समिती गणात झालेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात असलेल्या जागेवर शिवसेनेने विजय मिळविला आहे. आगमी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होत असल्याने राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने सर्व शक्ती पणाला लावण्यात आली होती.
शिवसेनेच्या विजयश्री सोमनाथ लांडगे या १२९५ मतांनी विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कांचन राजेंद्र कोंडे यांना पराभव पत्करावा लागला. या गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा उत्तम चोरघे यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाल्याने जागा रिक्त झाली होती. लांडगे, कोंडे यांच्यासह भाजपकडून अश्विनी संतोष चोरघे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. लांडगे यांना ५३२५ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या कांचन कोंडे यांना ४०३० मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
भाजपच्या अश्विनी संतोष चोरघे यांना २११२ मते मिळाली. विजयानंतर शिवसेनेच्या समर्थकांनी जल्लोष करीत पंचायत समिती मतदार विजयी मिरवणूक काढून मतदारांचे आभार मानले. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर व आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर खेड गणाची पोट निवडणूक होत असल्याने जिल्ह्याचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते.
राष्ट्रवादी काँगे्रसने देखील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामुळे जिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकारी खेड गणामध्ये डेरा टाकून होते. परंतु या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदावर लांडगे या विजयी झाल्या. हा निकाल राष्ट्रवादी काँगे्रससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. (प्रतिनिधी)