Gram Panchayat Result Pune: राष्ट्रवादीने बालेकिल्ला सोडलाच नाही; बारामतीत वर्चस्व कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:16 PM2022-12-20T14:16:48+5:302022-12-20T14:24:49+5:30

वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी व पणदरे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीची ठरली

NCP did not leave the fort Dominance continues in Baramati | Gram Panchayat Result Pune: राष्ट्रवादीने बालेकिल्ला सोडलाच नाही; बारामतीत वर्चस्व कायम

Gram Panchayat Result Pune: राष्ट्रवादीने बालेकिल्ला सोडलाच नाही; बारामतीत वर्चस्व कायम

googlenewsNext

सोमेश्वरनगर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी व पणदरे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीची ठरली. पणदरेत माळेगावचे माजी चेअरमन तानाजी कोकरे यांच्या पॅनेलने सरपंचपदाची बाजी मारली, मात्र सत्यजित जगताप व विक्रम कोकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उभ्या  केलेल्या पॅनेलला गावकऱ्यांनी मोठी साथ दिल्याने त्यांच्या गटाचे ८ उमेदवार विजयी झाले. तर तानाजी कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ७ जागा व सरपंचपदाची जागा अजित सोनवणे यांनी जिंकली.
        
पळशी ग्रामपंचायतीत जिल्हा परीषदेचे माजी सभापती भाऊसाहेब करे व माजी उपसरपंच माणिक काळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तानाजी कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. सरपंचपदाच्या जागेसह १० पैकी १० जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले.
        
कुरणेवाडी गावात बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना मोठा धक्का बसला असून कुरणेवाडी काळभोर गटाने ६ विरूध्द २ जागांनी संदिप जगताप यांना काळभोर गटाने धक्का दिला आहे. हनुमंत काळभोर व सूर्यकांत काळभोर यांनी जगताप यांनी जगताप गटाला कडवे आव्हान दिल्याने गावच्या सरपंचपदी आशा किसन काळभोर या निवडून आल्या आहेत. येथे वारूळबाबा स्वाभिमान पॅनेलने बाजी मारली आहे.

गडदरवाडीत सतिश काकडे, प्रमोद काकडे व सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री सोमेश्वर ग्रामविकास पॅनेलने बाजी मारत सरपंचपदासह सर्व जागा जिंकल्या आहेत. येथे सोमेश्वरचे संचालक शैलेश रासकर व लक्ष्मण गोफणे यांच्या पॅनेलचा येथे पराभव झाला आहे.
          
वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी गाव पॅनेलला धक्का देत अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. गाव पॅनेल असलेला हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार विद्या भोसले यांचा पराभव झाला आहे. मुरूम येथे नंदकुमार शिंगटे हे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर १३ पैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत.

सरपंचपदी निवडुन आलेले ग्रामपंचायत निहाय उमेदवार

बारामती तालुका

१)वाणेवाडी ग्रामपंचायत - गीतांजली जगताप
२)कुरणेवाडी - आशा किसन काळभोर
३)मुरुम - संजयकुमार नामदेव शिंगटे
४)पणदरे - अजय कृष्णा सोनवणे
५)लोणी भापकर - गीतांजली रविंद्र भापकर
६)सोरटेवाडी - भारती अनिरुध्द सोरटे
७)वाघळवाडी - हेमंत विलास गायकवाड
८)मोरगांव - अलका पोपट तावरे
९)पळशी - काळे ताई
१०)गडदरवाडी - मालन पांडुरंग गडदरे
११)मासाळवाडी - मुरलीधर किसन ठोंबरे
१२)काऱ्हाटी - दिपाली योगेश लोणकर
१३)सोनकसवाडी—राणी सतीश कोकरे.

Web Title: NCP did not leave the fort Dominance continues in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.