राष्ट्रवादी कॉंग्रेसची सात विधानसभानिहाय अध्यक्षांसह २४१ जणांची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:15 AM2021-09-10T04:15:30+5:302021-09-10T04:15:30+5:30

पुणे : महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसची २४१ जणांची जम्बो कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये पर्वती ...

NCP has 241 executives including seven assembly wise presidents | राष्ट्रवादी कॉंग्रेसची सात विधानसभानिहाय अध्यक्षांसह २४१ जणांची कार्यकारिणी

राष्ट्रवादी कॉंग्रेसची सात विधानसभानिहाय अध्यक्षांसह २४१ जणांची कार्यकारिणी

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसची २४१ जणांची जम्बो कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ वगळता सात अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्वती मतदार संघातून अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाणार आहे.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. भौगोलिकदृष्ट्या देशातील दुसऱ्या व राज्यातील पहिल्या क्रमांकाचे शहर असलेल्या, पुणे शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांच्याशी समन्वय साधून पक्षाचे ध्येय-धोरण पोहोचविण्यासाठी ही कार्यकारिणी काम करेल. कार्यकारिणीतील एकूण पदांपैकी १५ टक्के पदांवर महिला कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून, यामध्ये नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

या नवीन कार्यकारिणीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी ॲड. नानासाहेब नलावडे यांची, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी उदय महाले, कार्याध्यक्षपदी राजू साने, सुकेश पासलकर यांची, खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी काका चव्हाण, कार्याध्यक्षपदी सुरेश गुजर, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी आनंद सवाणे, कार्याध्यक्षपदी पोपटराव गायकवाड, नरेश जाधव, कसबा विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी गणेश नलावडे, कार्याध्यक्षपदी निलेश वरे, दीपक पोकळे, कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी हर्षवर्धन मानकर, कार्याध्यक्षपदी नितीन कळमकर, हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी डॉ़ शंतनू जगदाळे व कार्याध्यक्षपदी संदीप बधे, अमर तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याचबरोबर आठही विधानसभा मतदारसंघनिहाय उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव, विविध सेल अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी व शहर कार्यकारिणी सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे़

पक्षाच्या खजिनदारपदी ॲड. निीलेश निकम यांची तर शहर प्रवक्तेपदी विशाल तांबे, महेंद्र पठारे, योगेश ससाणे, प्रदीप देशमुख व भय्यासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.

---------------------

Web Title: NCP has 241 executives including seven assembly wise presidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.