राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयाचा ताबा घेणे अशक्य; अन्यथा पोलिसात जाणार- प्रशांत जगताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:24 PM2023-07-05T12:24:31+5:302023-07-05T12:27:58+5:30

शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांना एकमुखी पाठिंबा...

NCP impossible to take over city office; Otherwise I will go to the police - Prashant Jagtap | राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयाचा ताबा घेणे अशक्य; अन्यथा पोलिसात जाणार- प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयाचा ताबा घेणे अशक्य; अन्यथा पोलिसात जाणार- प्रशांत जगताप

googlenewsNext

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसपुणे शहरच्या नावे पॅन कार्ड नसल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे ॲग्रिमेंट हे प्रशांत सुदामराव जगताप नावाने आहे. शहराध्यक्ष म्हणून ते मी माझ्या नावे केले आहे. त्यामुळे उद्या या कार्यालयाचा अन्य गटाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाला, तर त्या विरोधात मला पोलिस तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचा ताबा कोणीच घेऊ शकणार नाही, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कार्यालयातील फलकावरील अजित पवार यांचा फोटो हटविण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जे आदेश देतील, त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही जगताप यांनी सांगितले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी दुपारी संपन्न झाली. त्यानंतर जगताप पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांना एकमुखी पाठिंबा देण्याचा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला असून, मुंबई येथील बुधवारी होणाऱ्या बैठकीला तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्ते जाणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ व नवीन पदाधिकारीही असतील. ही लढाई कायदेशीर पातळीवर जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आज उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून, आम्ही सर्व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे.

चेतन तुपे, सुनील टिंगरे यांची बैठकीला दांडी

शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांबरोबरच माजी नगरसेवक व आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ते का आले नाहीत? हे माहीत नाही. मात्र, उद्याच्या शरद पवारांच्या बैठकीला शहरातील आमदार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान जगताप यांनी आजच्या बैठकीला मावळत्या पुणे महापालिका सभागृहातील ४४ पैकी २३ नगरसेवक उपस्थित होते, असा दावा यावेळी केला.

Web Title: NCP impossible to take over city office; Otherwise I will go to the police - Prashant Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.