पुण्यात वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीने काढली गॅससिलेंडरची अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 06:27 PM2021-10-07T18:27:24+5:302021-10-07T18:44:58+5:30
मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेंव्हा ७२ रुपये लिटर पेट्रोल मिळत होते. परंतु तेच पेट्रोल आज १०५ रुपये झाले आहे.
पुणे : केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात पासलकर गॅस एजन्सी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी शिवाजीनगर मतदारसंधाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतीने जनता हैराण झाली आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेंव्हा ७२ रुपये लिटर पेट्रोल मिळत होते. परंतु तेच पेट्रोल आज १०५ रुपये झाले आहे. त्यातच पुन्हा घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे.
पुण्यात वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीने काढली गॅससिलेंडरची अंत्ययात्रा #Maharashtra#centralgovernmentpic.twitter.com/QUmZAIMdVt
— Lokmat (@MiLOKMAT) October 7, 2021
आता घरगूती गॅस ला तब्बल १००० रुपये पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. जो पर्यंत सरकार महागाई कमी करत नाहीत तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेच तीव्र आंदोलन करत राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. पासलकर गॅस एजन्सी ते काॅर्पोरेशन चैकापर्यंत गॅस सिलेंडर ची अत्यंयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख, उदय महाले, बाळासाहेब बोडके, निलेश निकम, महेश हांडे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.