कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 06:15 PM2023-03-04T18:15:13+5:302023-03-04T18:20:02+5:30

नागालँडमध्ये विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे...

ncp leader sharad pawar said Whose kasba was it, what decision did the people take | कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर- शरद पवार

कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर- शरद पवार

googlenewsNext

बारामती (पुणे) : मला स्वत:ला देशात बदलाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. पुण्याची निवडणूक काय सांगते, मागील पदवीधर निवडणुकीत जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली, तर एकही जागा मिळू शकली नाही. सरकार त्यांचं आहे, सत्तेचा पूर्ण वापर त्यांच्याकडून होतो, हे या निवडणुकीत दिसून आले. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला. बदल होण्यास अनुकूल वातावरण निर्मिती होत आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे.

गोविंदबाग या निवासस्थानी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले. आता निष्कर्ष काढणे योग्य नाही, मला जी माहिती मिळाली आहे, त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, एकूण निवडणुकांवरून देशात बदलाचे वारे दिसत आहे. निवडणुका येथील त्यावेळी लोक सर्व निवडणुकीच्या निकालांचा, निर्णयाचा विचार जरूर करतील, असे पवार म्हणाले.

मी दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. यावेळी मला शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती दिली, काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असतानाही कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला, त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. शिंदे आणि फडणवीस सरकार कांदा उत्पादकांबाबत ‘करतो करतो’ म्हणतात, प्रत्यक्षात निर्णय घेत नसल्याची टीका पवार यांनी केली.

सर्वोच्च न्यायालाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदल केला. त्याच्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आहेत, मुख्य म्हणजे विरोधी पक्षनेता ही याच्यामध्ये आला, या सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. हा लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.

नागालँडमध्ये विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे

नागालँडला १२ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या सरकारमध्ये मान्यता प्राप्त विरोधी पक्षाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. त्या संदर्भात पक्षाचे जनरल सेक्रेटरींना त्या ठिकाणी पाठविले आहे. ते संबंधितांशी चर्चा करून याबाबतचा अहवाल मला पाठवतील. त्यानंतर, पुढील निर्णय घेणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

Web Title: ncp leader sharad pawar said Whose kasba was it, what decision did the people take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.