राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वीज बिल माफीसाठी पवारांकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:19+5:302021-09-10T04:16:19+5:30

याबाबत सभापती देवदत्त निकम म्हणाले की, गेली २ वर्षे शेतकरी हा कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतमालाला बाजारभाव मिळत ...

NCP leaders go to Pawar for electricity bill waiver | राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वीज बिल माफीसाठी पवारांकडे साकडे

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वीज बिल माफीसाठी पवारांकडे साकडे

Next

याबाबत सभापती देवदत्त निकम म्हणाले की, गेली २ वर्षे शेतकरी हा कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. वीज वितरण कंपनीने वीज बिले भरली नाही. म्हणून कृषी पंपाचे वीजजोडणी तोडण्याचे काम सुरू केले आहे. थकीत वीज बिले ३ वर्षात भरण्याचे वीज वितरण कंपनीने धोरण ठरविले आहे; परंतु शेतकऱ्यांना ते मान्य नाही व वीज बिल भरणेही शक्य होणार नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज मिळाली पाहिजे, तसेच दिवसा वीज मिळाली पाहिजे, असेही त्यांनी शरद पवार यांना सांगितले.

त्याबाबत श्री पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना याबाबत लक्ष घालावे व मार्ग काढावा, अशा सूचना दिल्या. शरद पवार यांनी आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत बोलू, असेही सांगितले. यामुळे कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाबाबत काय निर्णय होतो, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, जि प माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अंकित जाधव उपस्थित होते.

Web Title: NCP leaders go to Pawar for electricity bill waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.