तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची पोलिस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:32 PM2020-08-10T12:32:32+5:302020-08-10T12:35:27+5:30

माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार व त्यांचे पती यांना जबाबदार धरावे..

NCP MLA was registred complaint in Khed police station | तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची पोलिस ठाण्यात तक्रार

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची पोलिस ठाण्यात तक्रार

Next
ठळक मुद्देतक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार

राजगुरूनगर: खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या पासून आपल्या जीवाला धोका असुन गुंड प्रवृत्ती आणि त्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.  
   सुचित्रा आमले खेडच्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामे करीत आहेत.जमिनीच्या नोंदी, दाखले,रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करीत आहेत.तहसीलदार यांच्या या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्यावर लोकप्रतिनिधी या नात्याने आपण चौकशी सुरू केली. मात्र हे केल्यावर तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका करण्याची थेट वक्तव्य केली.त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही. मात्र हा माणूस गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरत असल्याचे सांगितले जाते. म्हणून त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले यांना जबाबदार धरावे असेही आमदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले. तक्रारीत तहसीलदार सौ आमले यांच्या पाठींब्याने ही कामे होत आहेत...


 

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलेले आरोप 
१) तालुक्यातील भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीत अवैध वाळू उपसा
२)सरकारी गायरान व सेझ जागेत अवैध उत्खनन 
३)कोरोनाच्या लॉक डाऊन काळात चाकण मध्ये तलाठी, सर्कलच्या माध्यमातून बेहिशेबी रक्कम गोळा केली
४)तहसीलदार आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मात्र कोरोना काळात एकही बैठक झाली नाही
५)त्यांच्या कामचुकार पणामुळे तालुक्यातील रुग्णवाढ
६)गुळाणी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण दाबले 
७)पतीच्या माध्यमातून तहसीलदार यांनी तालुक्यातुन मोठी माया गोळा केली 
८)पती बाळासाहेब आमले गुंडांशी संबंधित असुन माझा घातपात करतील

Web Title: NCP MLA was registred complaint in Khed police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.