रा्ष्ट्रवादीने केवळ वल्गना केल्या मात्र लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्र केला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:28+5:302021-08-01T04:11:28+5:30
--- नारायणगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्रात पाहिल्या वर्षीच २७ हजार गावे लोडशेडिंग मुक्त केली ...
---
नारायणगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्रात पाहिल्या वर्षीच २७ हजार गावे लोडशेडिंग मुक्त केली होती. ४५ लाख शेतकऱ्यांना ५ वर्ष २८ हजार कोटीची वीज दिली. एकाही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित केले नाही मात्र लोडशेडिंग मुक्त करण्याची वल्गना करणारे राष्ट्रवादीचे नेते लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र करू शकले नाहीत, अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारूळवाडी (नारायणगाव ) येथे दिली
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी ( दि. ३० ) वारुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, भाजपचे जिल्हा प्रमुख गणेश भेगडे ,जिल्हा संघटक धर्मेंद्र खांडरे ,भाजपचे युवा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील,किरण दगडे पाटील ,भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष तांबे , भगवान घोलप , आशिष माळवदकर , अमोल कोऱ्हाळ, दिलीप गांजाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले कि, महाराष्ट्रातल्या ४८ हजार ग्रामपंचायतीमध्ये वारूळवाडी ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट कामकाज व प्रशस्त प्रशासकीय कार्यालय आहे. एलिफंटा या प्रकल्पाला समुद्रामार्गातून वीज दिली. आघाडी सरकारकडून ग्रामपंचायतीला हुकूमशाही व मुघलशाही पद्धतीने निर्णय घेऊन १५ व्या वित्त आयोगातील केंद्र सरकारकडून आलेला पैसा जो ग्रामपंचायतीकडून आराखडा तयार करून मागितला तो पैसा ग्रामपंचायतीच्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट व पाणी नळ योजनेचे बिल याकरिता वापरा असा अध्यादेश आघाडी सरकारने काढला मात्र हे पैसे मागील सरकारच्या काळात राज्यसरकारने स्ट्रीट लाईट व पाणी नळ योजनेचे बिलांचे बजेट करून जिल्हापरिषदेच्या माध्यमातून सरकारने भरले आहेत. या आघाडी सरकराने सध्या घेतलेला निर्णय चुकीचा आहे. यानिर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. सरकारने ग्रामपंचायतीच्या बिलांचे बजेट करून पैसे भरावेत अशी मागणी केली. ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा आणू नये अशी विनंती राज्य सरकारला बावनकुळे यांनी केली आहे. यावेळी जि. प. सदस्या आशा बुचके यांनी स्वागत केले. सरपंच राजेंद्र मेहेर यांनी प्रास्तविक व आभार मानले.
-----
फोटो क्रमांक : ३१ नारायणगाव चंद्रकांत बावनकुळे
फोटो :वारुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट प्रसंगी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करताना जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके.
310721\maji urjamantri.jpeg
वारुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट प्रसंगी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करताना जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके .