"शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी अन्..." पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 02:09 PM2022-11-03T14:09:02+5:302022-11-03T14:09:15+5:30

भरती रद्द , महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला; महाराष्ट्रातील तरुणांनी करायचे तरी काय ....?

NCP protest in Pune | "शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी अन्..." पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

"शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी अन्..." पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Next

पुणे : "शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी करतात गुजराती चाकरी" , "द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी" , "पन्नास खोके महाराष्ट्राला धोके" घोषणाबाजी करत पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लाल बहादूर शास्त्री रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. 

जयंत पाटील म्हणाले, राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे - फडणवीस सरकारने तरुणांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. कुठलाही नवीन प्रकल्प त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्याची शिंदे फडणवीस सरकारमध्ये इच्छाशक्ती नसताना राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले प्रकल्प देखील यांना टिकवता आलेले नाही. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या अडचणीत सापडल्या असून त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली पोलीस भरती देखील या सरकारने स्थगित करून तरुणांच्या शासकीय नोकऱ्यांचा मार्ग देखील बिकट केला आहे. राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले आहेत. लवकरात लवकर या सर्व भरत्या घेण्यात याव्यात यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने आम्ही घेत आहोत.

राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने महाराष्ट्रातला युवक बेरोजगार केला आहे. राज्यात युवकांचे भवितव्य अधिक गडद होत असल्या बाबत पालकांच्या पोटाला पीळ पडला आहे अनेक मोठमोठे उद्योग बाहेर पाठवले गेले , पोलीस भारतीचा बनाव करून युवक निराश झाला आहे. महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे याची खंत वाटते. महाराष्टाच्या हिताचे निर्णय घेण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात अनेक लोकांहिताचे प्रश्न आ वासून उभे आहेत. युवक बेरोजगारीने हंबरडा फोडत आहेत. आजपर्यंत आपला पोशिंदा राजा बळीराजा पूर्ण पणे कोलमडला आहे. लाखो आत्महत्या पहायला मिळत आहेत. आता वेळ आली आहे या महाराष्ट्रातला युवक वर्ग बेरोजगारीने पिचला जात असून त्यांच्या हाताला काम देण्याचे धोरण सरकार कडे नाही.  हे चित्र बदलण्यात शिंदे सरकार कडे ठोस कुठलेही धोरण नाही" , असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

Web Title: NCP protest in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.