जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला धक्का; शिवसेनेचा उपनगराध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 05:00 PM2020-01-14T17:00:02+5:302020-01-14T17:07:10+5:30

आपला माणूस आपली आघाडी व राष्ट्रवादीची मते फुटली...

Ncp push in Junnar; Shiv Sena's Deputy Nagardhyaksha | जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला धक्का; शिवसेनेचा उपनगराध्यक्ष 

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला धक्का; शिवसेनेचा उपनगराध्यक्ष 

googlenewsNext
ठळक मुद्देकास्टिंग वोटच्या आधारे १0 मते घेऊन शिवसेनेचे दीपेशसिंह परदेशी उपनगराध्यक्षपदी

जुन्नर : जुन्नर नगर परिषदेच्या  उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत  आपला माणूस आपली आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटल्याने जुन्नरमध्ये शिवसेनेने उपनगराध्यक्षपद खेचून आणले.
शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना समसमान प्रत्येकी ९ मते पडल्याने नगराध्यक्षांनी बजाविलेल्या कास्टिंग वोटच्या आधारे १0 मते घेऊन शिवसेनेचे गटनेते दीपेशसिंह परदेशी उपनगराध्यक्षपदी निवडून आले. ९ मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली म्हस्के यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उपनगराध्यक्षपदी परदेशी यांची निवड झाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली होती. 
निवडणुकीसाठी दीपेशसिंह परदेशी, मोनाली म्हस्के, सना मंसुरी यांचे  अर्ज आले होते. सना मंसुरी यांनी अर्ज मागे घेतल्याने परदेशी व म्हस्के  यांच्यात लढत झाली.  नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे शाम पांडे नगराध्यक्षपदी निवडून आले होते. परंतु सभागृहात एकूण १७ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, शिवसेनेचे ५ तर आपला माणूस आपली आघाडीचे ४ नगरसेवक होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने स्वत:ची ५ मते, आघाडीची २ मते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे १ मत आपल्याकडे वळवून एकूण ८ मते मिळविली. नगराध्यक्षांनादेखील नगरसेवकाबरोबर स्वत:चे १ मत देण्याचा अधिकार असल्याने दीपेश परदेशी यांना ९ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या  उमेदवार मोनाली म्हस्के यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ७ मते मिळाली, तर आपला माणूस आपली आघाडीची २ मते मिळाली. परिणामी त्यांनादेखील ९ मते मिळाल्याने दोन्ही उमेदवारांना समसमान ९ मते मिळाली. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची पद्धत महाराष्ट्रात सुरू झाल्यावर नगराध्यक्ष यांना कास्टिंग वोट देण्याचा  विशेषाधिकार शासनाने बहाल केला होता. त्याप्रमाणे  नगराध्यक्ष  शाम पांडे यांनी कास्टिंग वोट दीपेश परदेशी यांच्या  बाजूने दिले. परदेशी यांची  १० मते झाल्याने त्यांचा विजय झाला.   शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, माजी पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, गणेश कवडे, शहरप्रमुख  चंद्रकांत डोके, शाम खोत, अतुल परदेशी, अंबर परदेशी, आनंद परदेशी, जयूशेठ परदेशी आदी मान्यवर तसेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.  
........

1 - राष्ट्रवादी काँगेसच्या तसेच आपला माणूस आपली आघाडीच्या काही नगरसेविका अर्थपूर्णरीत्या ‘नॉट रीचेबल’ असल्याचे तसेच शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे  सांगण्यात येत होते. हे सर्वच नगरसेवक थेट निवडणुकीपूर्वी सभागृहात दाखल झाले.

2- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका समीना शेख यांची भूमिका नेहमीच पक्षविरोधी राहिली आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघनप्रकरणी त्यांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव अगोदरच जिल्हाधिकारी यांचेकडे प्रलंबित आहे.

3- या निवडणुकीत देखील पक्षाचा व्हिप बजावला होता. तो झुगारल्याने पुन्हा त्यांचे पद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी सांगितले

Web Title: Ncp push in Junnar; Shiv Sena's Deputy Nagardhyaksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.