राष्ट्रवादी, आपला माणूसचा शिवसेनेला दे धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 02:39 AM2019-01-22T02:39:27+5:302019-01-22T02:39:35+5:30

नगरपालिकेच्या सन २०१९ च्या विषय समित्यांच्या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला माणूस आपली आघाडीने एकूण ५ पैकी ४ समित्यांचे सभापतिपद पटकावीत सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला.

NCP, pushing the Shivsena to your man | राष्ट्रवादी, आपला माणूसचा शिवसेनेला दे धक्का

राष्ट्रवादी, आपला माणूसचा शिवसेनेला दे धक्का

Next

जुन्नर : नगरपालिकेच्या सन २०१९ च्या विषय समित्यांच्या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला माणूस आपली आघाडीने एकूण ५ पैकी ४ समित्यांचे सभापतिपद पटकावीत सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. शिवसेनेला केवळ एका समितीच्या सभापतिपदावर समाधान मानावे लागले. गेल्यावर्षी विषय समिती निवडणुकीत शिवसेना व आघाडीला प्रत्येकी २ सभापतिपद मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला १ सभापतिपद मिळाले होते. मात्र, यावेळी राष्ट्रवादी व आघाडीत समझोता एकत्रित झाल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. परिणामी अवघ्या एका सभापतिपदावर शिवसेनेला समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेने पक्षाने बजाविलेला आदेश डावलून शिवसेनेच्या एका नगरसेविकेच्या सभापतिपदाच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही केल्याने तसेच मतदान केल्याने ती समिती शिवसेनेच्या ताब्यात गेली. अन्यथा शिवसेनेला पुरते धोबीपछाड देण्यात आम्ही यशस्वी झालो असतो, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी केला. विषय समितीची निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी कामकाज पाहिले.
नगरपालिका सभागृहात शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जरी असले तरी नगरसेवकांचे संख्याबळ ५ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व आपला माणूस आपली आघाडी यांची दिलजमाई झाल्याने शिवसेनेला विषय समिती निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका समीना शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व प्रतोद दिनेश दुबे यांनी सांगितले. नगरसेविकेला विहित वेळेत पक्षादेश बजाविला होता. तसेच नगरसेविका जरी समीना शेख असल्या तरी सर्व कामकाजामध्ये त्यांचे पती ढवळाढवळ करतात व सर्व काम डमी नगरसेवक म्हणून तेच पाहत असतात. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नगरसेविकेला नगरपालिकेतून घरची वाट दाखविणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
>१ आरोग्य, क्रीडा व वृक्षसंवर्धन समिती- सभापती- जमीर खान कागदी, सदस्य- अंकिता गोसावी, अविन फुलपगार, सय्यद अब्दुल माजिद, फिरोज पठाण.
२ पाणीपुरवठा समिती- सभापती- दिनेश दुबे, सदस्य- समीर भगत, दीपेश परदेशी, फिरोज पठाण, हाजरा इनामदार
३ वीज समिती- सभापती- अलका फुलपगार, सदस्य- दीपेश परदेशी, वैभव मलठणकर, अश्विनी गवळी, कविता गुंजाळ.
४ बांधकाम समिती- सभापती-लक्ष्मीकांत कुंभार, सदस्य- वैभव मलठणकर, समीर भगत, अक्षय मांडवे, हाजरा इनामदार.
५ महिला व बालकल्याण समिती - सभापती- सुवर्णा बनकर, सदस्य- अंकिता गोसावी, समीना शेख, अक्षय मांडवे, सना मन्सुरी.

Web Title: NCP, pushing the Shivsena to your man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.