राष्ट्रवादीत एका जागेसाठी रस्सीखेच

By admin | Published: October 13, 2016 02:44 AM2016-10-13T02:44:25+5:302016-10-13T02:44:25+5:30

शहरातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या दोन तीन सदस्यीय प्रभागांपैकी एक असलेल्या रामटेकडी-सय्यद या प्रभाग क्रमांक २४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ विद्यमान नगरसेवकांचा प्रभाग

In the NCP, the ropes for a seat | राष्ट्रवादीत एका जागेसाठी रस्सीखेच

राष्ट्रवादीत एका जागेसाठी रस्सीखेच

Next

हडपसर : शहरातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या दोन तीन सदस्यीय प्रभागांपैकी एक असलेल्या रामटेकडी-सय्यद या प्रभाग क्रमांक २४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ विद्यमान नगरसेवकांचा प्रभाग येत आहे. त्यामुळे तिथे मोठ्या चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या एका जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा विद्यमान नगरसेवकांमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे.
महापालिकेची यंदाची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. महापालिकेसाठी आगामी सदस्यांची संख्या १६२ इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेवटची जुळवाजुळव करण्यासाठी दोन प्रभाग ३ सदस्यीय बनविण्यात आले. त्यापैकी एक असा रामटेकडी व सय्यदनगर प्रभाग आहे. या प्रभागामध्ये वैदूवाडी, रामटेकडी या झोपडपट्टी भागांसह मध्यमवर्गीयांचा भाग समाविष्ट आहे. प्रभागाची लोकसंख्या ६३ हजार ३०४ इतकी आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या हडपसर गावठाण-वैदूवाडी (क्र.४२, रामटेकडी-वानवडी (क्र.४६), सय्यद नगर (क्रमांक ४५) या तीन प्रभागांचा बहुतेक भाग या नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आनंद अलकुंटे, फारूक इनामदार, विजया कापरे, कॉँग्रेसचे सतीश लोंढे, कविता शिवरकर, विजया वाडकर यांचा समावेश आहे.
खुल्या प्रभागासाठी एकच जागा असताना येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आनंद अलकुंटे व फारूक इनामदार लढण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून इम्तियाज शेख, राम कसबे, श्याम ससाणे, उत्तम आढाव, असिफ मणियार यांच्या नावांची या प्रभागासाठी चर्चा आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाचे (ओबीसी) जातप्रमाणपत्र असल्याने काही जण महिलेसाठी राखीव असलेल्या जागेसाठी आग्रही आहेत. काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक सतीश लोंढे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन कांबळे, संतोष सुपेकर, शफी इनामदार यांच्या नावांची चर्चा आहे.
भाजपाकडून शहाजी खंडागळे, अशोक लाकडे, शराफत पानसरे यांच्या नावांची चर्चा सुरू असून, ओबीसी प्रवर्गातून उषा लाकडे यांच्या नावाची चर्चा आहे. मनसेकडून सतीश गायकवाड, दादा साठे आदींची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. शिवसेनेकडून सतीश कसबे यांच्यासह काही नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रभागामध्ये झोपडपट्टींचा परिसर मोठा असल्याने तेथील मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रभागावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. तीन सदस्यीय प्रभाग असताना ६ विद्यमान नगरसेवकांचा भाग या प्रभागात येत आहे.
(वार्ताहर)

Web Title: In the NCP, the ropes for a seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.