केंजळ ग्रामपंचायतीवर सलग चौथ्यांदा राष्ट्रवादीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:31+5:302021-01-21T04:10:31+5:30
माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखालील काळ भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने ही निवडणूक लढवली होती. निवडणुकीत राकेश तुळशीदास ...
माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखालील काळ भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने ही निवडणूक लढवली होती. निवडणुकीत राकेश तुळशीदास बाठे, किरण मारुती येवले, उत्तम किसन शेटे, कविता अजय बाठे, अंजुषा रोहिदास येवले, सविता आनंदा बाठे, सुवर्णा महादेव काळे हे उमेदवार बहुमताने विजयी झाले तसेच किरण सोमनाथ जाधव, शीतल उमाकांत राऊत हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित लढवली होती. एकूण ९ जागांपैकी ६ जागांवर राष्ट्रवादीने तर ३ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या आणि राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
मागील २० वर्षांत चंद्रकांत बाठे यांच्या गटाला सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. या निवडणुकीत गावातील पंचकमिटी शरद दातीर, कैलास येवले, नारायण भालघरे, दिलीप मारुती बाठे, संतोष बाठे, गोपाळ जाधव, सचिन नांदे यांनी काळ भैरवनाथ ग्रामविकास पॅनल विजयी करण्यासाठी विशेष परिश्रम केले. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार चंद्रकांत बाठे यांच्या हस्ते करण्यात आला.
केंजळ ग्रामपंचायतीने गावात आदर्श प्राथमिक शाळा सौरऊर्जा प्रकल्प या शिवाय गावातील विविध विकासकामे केली आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी सलग चौथ्यांदा काळ भैरवनाथ ग्रामविकास पॅनलवर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे.
२० भोर केंजळ
नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व इतर.