राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षसंघटन अधिक मजबूत करणार : प्रतापराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:02+5:302021-06-11T04:09:02+5:30

-- इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी बावीस वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करून गावोगावी पक्षाच्या शाखा ...

NCP will strengthen its party organization: Prataprao Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षसंघटन अधिक मजबूत करणार : प्रतापराव पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षसंघटन अधिक मजबूत करणार : प्रतापराव पाटील

Next

--

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी बावीस वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करून गावोगावी पक्षाच्या शाखा चालू केल्या. आज साहेबांचे कार्य समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी अजून नेटाने सक्रिय राहावे. आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका जनसंपर्क कार्यालयावर गुरुवार ( दि. १० जून ) रोजी मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाविसावा वर्धापन दि. साजरा करण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून ध्वजारोहण करून मानवंदना दिली व कार्यालयात पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.

या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, सागरबाबा मिसाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नवनाथ ( आबा ) रुपणवर, नगरसेविका हेमलता माळुंजकर, नगरसेवक पोपट शिंदे, प्रशांत सिताप, अमर गाडे, स्वप्निल राऊत, दिलीप वाघमारे, दादा सोनवणे, रणजित घोगरे, आण्णासाहेब धोत्रे, स्मिता पवार, सागर पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : १० इंदापूर राष्ट्रवादी कॉंग्रेस

फोटो ओळ : इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी ध्वजारोहण करताना.

Web Title: NCP will strengthen its party organization: Prataprao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.