‘राष्ट्रवादी’च्या टेकावडे विजयी

By admin | Published: January 12, 2016 04:01 AM2016-01-12T04:01:02+5:302016-01-12T04:01:02+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर पोटनिवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड कायम राखला. सुजाता टेकावडे यांनी शिवसेनेचे विजय गुप्ता यांचा ६३१ मतांनी पराभव केला.

NCP won the teakavade | ‘राष्ट्रवादी’च्या टेकावडे विजयी

‘राष्ट्रवादी’च्या टेकावडे विजयी

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर पोटनिवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड कायम राखला. सुजाता टेकावडे यांनी शिवसेनेचे विजय गुप्ता यांचा ६३१ मतांनी पराभव केला. सहानुभूतीच्या बळावर सुजाता टेकावडे या विजयी झाल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खुनाच्या घटनेनंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी काळभोरनगर प्रभागातील पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार रविवारी मतदान झाले. त्यात एकूण ४६ टक्के मतदान झाले होते. एकूण ८४४६ जणांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. आकुर्डीतील हेडगेवार भवनात सकाळी मतमोजणी सुरू झाली. सकाळी अकरापर्यंत निकाल जाहीर झाला. राष्ट्रवादीच्या सुजाता टेकावडे, शिवसेनेचे विजय गुप्ता, भाजपाचे गणेश लंगोटे यांच्यात प्रमुख लढत होती.
पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे गुप्ता आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअखेर टेकावडे यांना ३४८६ मते, गुप्ता यांना २८५५ मते, लंगोटे यांना २००२ मते मिळाली. मतमोजणीच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीत गुप्ता हे ८१० मतांनी आघाडीवर होते. त्यांना २११० मते मिळाली, तर टेकावडेंना १३०० मते मिळाली होती, तर लंगोटे यांना ५५६ मते मिळाली होती. मतांची ही कमी भरून काढून टेकावडे यांनी अंतिम फेरीत ६३१ मतांची आघाडी घेतली. शिवसेना व भाजपाला शह दिला. १०३ मतदारांनी नोटाचा अधिकार बजावला. खासदार अमर साबळे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपा उमेदवारासाठी आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेना उमेदवारासाठी लक्ष घालूनही उपयोग झाला नाही.
टेकावडे यांचे नाव निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी जाहीर केले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका वैशाली काळभोर, शमीम पठाण, नीलेश पांढरकर, प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी टेकवडे यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)

काळभोरनगर प्रभागाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात केलेल्या विविध कामांवर जनतेने विश्वास दाखविला. त्यांचा हा विजय आहे. या विजयाने राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.- शकुंतला धराडे, महापौर

धनशक्ती विरुद्ध मनशक्तीचा हा विरोध आहे. धनशक्तीला पराजित केले. आमच्याकडे आमदार, खासदार नसताना कार्यकर्ते आणि मतदारबंधंूनी राष्ट्रवादीस कौल दिला. काळभोरनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. मतदान करून अविनाश टेकावडे यांना श्रद्धांजली वाहिली.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड

Web Title: NCP won the teakavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.