राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:24 PM2021-06-02T17:24:11+5:302021-06-02T17:34:14+5:30

रविराज तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी सायंकाळी गोळीबार केला.

NCP youth leader Raviraj Taware was shifted to Pune for further treatment | राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले

राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले

Next
ठळक मुद्देप्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे स्पष्टीकरण

बारामती: जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांचे पती  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे यांना बुधवारी (दि २) पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे,त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे. केवळ पुढील उपचारासाठी तावरे यांना पुण्याला हलविण्यात आल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. रमेश भोईटे यांनी सांगितले.

तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी (दि. ३१) सायंकाळी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यानंतर तावरे यांच्यावर येथील गिरीराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.गिरीराज रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे हृदयशस्त्रक्रिया तज्ञ डॉ. रमेश चव्हाण, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. निती महाडिक, भुलतज्ञ डॉ संतोष घालमे, डॉ.अमर पवार, डॉ.संजय पुरंधरे,हृदयरोगतज्ञ डॉ.सनी शिंदे,डॉ.सुनील पवार, डॉभास्कर जेधे, डॉ अजिंक्य निंबाळकर आदी डॉक्टरांच्या पथकाने मंगळवारी(दि १) मध्यरात्री दीड ते दोन च्या सुमारास शस्त्रक्रिया करत तावरे यांच्या शरीरात घुसलेली गोेळी बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तावरे यांच्यावर गिरीराजच्या अतिदक्षता विभागात सुरु होते.
याबाबत डॉ. भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाहि,त्यांची प्रकृती स्थिर आहे.नातेवाईकांच्या इच्छेनुसार पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलविण्यात आले आहे.
—————————————
...तीन आरोपींना ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, रविराज तावरे गोळीबार प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीसांनी  एका अल्पवयीन मुलासह राहुल उर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांना केली अटक केली आहे. त्यापैकी तीन आरोपींना ७ जुन पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे,तर अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे,अशी माहिती तपास अधिकारी बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
———————————————

Web Title: NCP youth leader Raviraj Taware was shifted to Pune for further treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.