नांदे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या आरती रानवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:11 AM2021-02-10T04:11:13+5:302021-02-10T04:11:13+5:30
निवडणुकीसाठी आरती रानवडे व प्रीती करंजावणे यांचे अर्ज आले होते ,त्यामध्ये आरती रानवडे यांनी प्रीती करंजावणे यांचा ६-३ अशा ...
निवडणुकीसाठी आरती रानवडे व प्रीती करंजावणे यांचे अर्ज आले होते ,त्यामध्ये आरती रानवडे यांनी प्रीती करंजावणे यांचा ६-३ अशा मताच्या फरकाने पराभव केला, तर उपसरपंचपदासाठी गुलाब ढमाले व सयाजी रानवडे यांचे अर्ज आले होते. त्यामध्ये गुलाब ढमाले यांनी सयाजी रानवडे यांचा ६-३ मतांच्या फरकाने पराभव केला. नांदे गावांमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी सरपंच प्रशांत रानवडे यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ विकास पॅनेलने नऊपैकी सहा जागा जिंकत दुसऱ्यांदा आपली सत्ता प्राप्त केली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून खोतकर व ग्रामसेविका राजश्री भुजबळ यांनी काम पाहिले.
याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच आरती विठ्ठल रानवडे व उपसरपंच गुलाब चिंतामण ढमाले तसेच नवनिर्वाचित सदस्य सुनील सखाराम जाधव, निकिता शेखर रानवडे, हेमलता निखिल रानवडे, संघमित्रा अजित ओव्हाळ यांचे ग्रामस्थांचा वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
--
फोटो ओळ : नांदे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला
सर ,,,या ग्रामपंचायतीकडून आपण मोठी जाहिरात घेणार आहे तरी कृपया ही बातमी लावावी