भिगवणमध्ये राष्ट्रवादीच्या भैरवनाथ पॅनेलचा धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:15+5:302021-01-19T04:13:15+5:30

भिगवण: इंदापूर तालुक्यात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये स्व. रमेशराव जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ...

NCP's Bhairavnath panel washed in Bhigwan | भिगवणमध्ये राष्ट्रवादीच्या भैरवनाथ पॅनेलचा धुव्वा

भिगवणमध्ये राष्ट्रवादीच्या भैरवनाथ पॅनेलचा धुव्वा

Next

भिगवण: इंदापूर तालुक्यात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये स्व. रमेशराव जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भैरवनाथ पॅनेलचा धु्व्वा उडवून १७ जागांपैकी १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मागील पाच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने

येथील ग्रामपंचायतीमध्ये मांडलेला संगीत खुर्चींचा खेळ त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसून आले आहे. ही निवडणूक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे.

भिगवण ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व विरोधी सर्वपक्षीय श्रीनाथ ग्रामविकास पॅनेल यांचेमध्ये थेट लढत होती. ९ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आधी चुरशीची वाटणाऱी ही निवडणूक श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने एकतर्फीच जिंकली असल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक एकमध्ये श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे सत्यवान अशोक भोसले, दीपिका तुषार क्षीरसागर हे दोघे निवडून आले आहेत, तर या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसप्रणीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या नीलिमा सचिन बोगावत या एकमेव उमेदवार निवडून आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक दोनमध्ये श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. येथे श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांच्या पत्नी प्रतिमा संजय देहाडे, स्वाती

दत्तात्रय धवडे व अमितकुमार बबन वाघ निवडून आले आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन जागांपैकी दोन्ही जागा जिंकत विरोधकांना चीत केले. या ठिकाणी

श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलेच तानाजी अनिल वायसे व माजी उपसरपंच जयदीप जाधव यांच्या पत्नी स्मिता जयदीप जाधव विजयी झाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक चारची निवडणूक विरोधकांकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या ठिकाणी श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलकडून पॅनेलप्रमुख पराग रमेशराव जाधव निवडणूक रिंगणात होते. येथे पॅनेलप्रमुखांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडुन करण्यात आला होता. परंतु विरोधकांचे चक्रव्यूह भेदत श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने याही प्रभागांमध्ये विरोधकांचा धुव्वा उडवत सर्व तिन्ही जागा जिंकल्या. येथे श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे पराग रमेशराव जाधव, गुराप्पा

गंगाराम पवार व मुमताज जावेद शेख विजयी झाले. या प्रभागांमध्ये माजी सरपंच व पॅनेलप्रमुख पराग जाधव विक्रमी ४१७ मतांनी विजयी होत विरोधकांना

धक्का दिला.

भिगवण स्टेशन येथील प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक सहामधील सर्व सहा जागा जिंकत विरोधकांना भुईसपाट केले. येथे प्रभाग क्रमांक

पाचमध्ये श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलचे सईबाई मच्छिंद्र खडके, तुकाराम रामचंद्र काळे व तस्लीम जमीर शेख विजयी झाले तर प्रभाग क्रमांक सहामध्ये कपिल माधव भाकरे, शीतल बाबासाहेब शिंदे व हरिश्चंद्र गोविंद पांढरे विजयी झाले आहेत.

१८भिगवण

विजयी उमेदवारांशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील.

Web Title: NCP's Bhairavnath panel washed in Bhigwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.