राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा झटका

By admin | Published: May 17, 2014 05:45 AM2014-05-17T05:45:35+5:302014-05-17T05:45:35+5:30

अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, रेडझोन, प्राधिकरणाचा साडेबारा टक्के परतावा हे प्रश्न प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसबद्दल नाराजी होती

NCP's defeat of defeat | राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा झटका

Next

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, रेडझोन, प्राधिकरणाचा साडेबारा टक्के परतावा हे प्रश्न प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसबद्दल नाराजी होती. त्यातच पक्षान्तर्गत गटबाजी थोपविण्यात आलेले अपयश यामुळे राष्टÑवादी काँग्रेसला मावळ लोकसभा मतदारसंघात पराभवाची धूळ चाखावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नागरिकांना शंकास्पद वाटली.अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न सुटला नाही म्हणुन त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी राजीनामे देण्याचे नाटक करायचे, तर कधी आम्हीच हा प्रश्न सोडवू असे अश्वासनही द्यायचे.अशी जनतेची दिशाभूल करण्याची ही दुटप्पी भूमिका राष्टÑवादी काँग्रेसच्या अंगलट आली.वेळोवेळी बंडखोरी करणार्‍या आमदार लक्ष्मण जगताप यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केले. परंतू अनधिकृत बांधकामाचा प्रश्न न सुटल्याने निवडणुकीत नागरिकांच्या रोषाचा फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन राष्टÑवादीची उमेदवारी नाकारून शेकापतर्फे निवडणूक लढण्याचा निर्णय जगताप यांनी घेतला. तेव्हा राष्टÑवादीवर पर्यायी उमेदवाराची शोधाशोध करण्याची वेळ आली. ज्यांना विचारणा केली,त्यांनी आम्हाला ‘बळीचा बकरा’ व्हायचे नाही.अशा शब्दात उमेदवारी घेण्यास नकार दिला. पक्षाची उमेदवारी नाकारणारे जगताप हे राष्टÑवादी काँग्रेसचेच ‘डमी’ उमेदवार आहेत. असा राष्टÑवादीतील इच्छुकांचा समज झाला.राष्टÑवादी काँग्रेसचे नेते कारवाईऐवजी बंडखोरांना सन्मानाची वागणूक देतात.अशी त्यांची भावना झाली. ऐनवळी राष्टÑवादी काँग्रेसला राहूल नार्वेकर हे घाटाखालचे उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली. राष्टÑवादीची उमेदवारी नाकारून शेकापतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले जगताप यांना महापालिकेतील ३० नगरसेवकांच्या गटाने उघड पाठींबा दिला. कोणीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नसते. पदे देता येतात, तशी काढून घेता येतात. पक्षाने दिलेल्या उमेदवाराचेच काम करावे. दिवसा एकाचे रात्री दुसर्‍याचे काम असा प्रकार घडता कामा नये. कोणाची गय केली जाणार नाही. असा सज्जड दम उपमुखयमंत्री अजित पवार यांनी दिला. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's defeat of defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.