नेत्यांच्या गटबाजीने राष्ट्रवादीचा पराभव

By admin | Published: November 15, 2014 12:14 AM2014-11-15T00:14:46+5:302014-11-15T00:14:46+5:30

नेत्यांच्या गटबाजीमुळे लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादीचा पराभव झाला, अशी प्रांजळ कबुली राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी दिली.

NCP's defeat with the stakes in leaders | नेत्यांच्या गटबाजीने राष्ट्रवादीचा पराभव

नेत्यांच्या गटबाजीने राष्ट्रवादीचा पराभव

Next
पिंपरी : नेत्यांच्या गटबाजीमुळे लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादीचा पराभव झाला, अशी प्रांजळ कबुली राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी दिली. तसेच आता गट-तट बाजूला ठेवून पक्ष संघटना मजूबत करण्याचे प्रयत्न व्हावेत अन्यथा पुढील काळ कठीण आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक व कार्यत्र्यांनी चिंतन बैठकीत व्यक्त केले.
बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीला भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. त्यावर चिंतन करण्यासाठी शहराध्यक्ष योगेश बहल, तसेच पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकत्र्यांची बैठक घेण्यात आली. आकुर्डीत सुमारे चार तास बैठक सुरू होती. महापौर शकुंतला धराडे, योगेश बहल, मंगला कदम, माजी महापौर आर. एस. कुमार, आझम पानसरे, संजोग वाघेरे, अजित गव्हाणो, दत्ता साने, प्रशांत शितोळे, सिद्धेश्वर बारणो, राजेंद्र काटे, हर्षल ढोरे यांच्यासह पक्षाचे बहुतांश पदाधिकारी व नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. आमदार लक्ष्मण जगताप गटाचे काही नगरसेवक वगळता उर्वरित नगरसेवकही बैठकीला उपस्थित होते. 
या बैठकीत नगरसेवक उल्हास शेट्टी, माजी नगरसेवक पंडित गवळी, रंगनाथ फुगे,गव्हाणो यांच्यासह काही कार्यकत्र्यांन पदाधिका:यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या स्वाभिमानी कार्यकत्र्याला बळ देण्याऐवजी त्यांना अडचणीत आणण्याचे काम पदाधिका:यांकडून होते, ही मनातील खदखद व्यक्त केली. 
नगरसेवक व कार्यकत्र्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर बहल व पानसरे 
यांनी मार्गदर्शन केले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू नका.
महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
 
4पक्षाच्या माध्यमातून आमदार झालेले हवी तेव्हा नगरसेवकांची मदत घेतात. परंतु नगरसेवकांना मदत करण्याची वेळ येते, तेव्हा प्रतिस्पर्धी तयार व्हायला नको म्हणून मदत करण्याऐवजी नगरसेवकांपुढे अडचणी निर्माण करतात. गटातटाचे राजकारण करू नका, असे वेळोवळी कार्यकत्र्याना सांगितले जाते. पण प्रत्यक्षात नेते, पदाधिकारीच गटा तटाचे राजकारण करतात. गटबाजी संपली नाही, तर पराभवाची पुनरावृत्ती होतच राहणार असेही त्यांनी सूचित केले.

 

Web Title: NCP's defeat with the stakes in leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.