बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम, विरोधक ठरले निष्प्रभ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:11 AM2017-10-18T02:11:00+5:302017-10-18T02:11:57+5:30

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत स्थानिक पातळीवरील पुढा-यांच्या पॅनलमध्ये लढत झाली.

 NCP's dominance in Baramati, proved to be incompetent | बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम, विरोधक ठरले निष्प्रभ  

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम, विरोधक ठरले निष्प्रभ  

Next

बारामती : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत स्थानिक पातळीवरील पुढा-यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालामध्ये १३ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. गडदरवाडीच्या सरंपचपदावर ३२ वर्षानंतर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. या ठिकाणी काकडे गटाची सत्ता होती.
पळशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती भाऊसाहेब करे यांना पराभवाचा धक्का बसला.
मोरगांवमध्ये राष्ट्रवादीच्याच दोन गटात लढत झाली. या ठिकाणी ढोले गटाची सत्ता उलथून माजी सरपंच पोपट तावरे यांच्या गटाने ग्रामपंचायतीची सत्ता मिळविली. लोणी भापकरमध्ये रवी भापकर यांच्या गटाचा पराभव झाला. काºहाटीमध्ये १० वर्र्षांपासून सत्तेत असणाºया पदाधिका-यांचा पॅनल पराभूत झाला. माजी पंचायत समिती सदस्य राजेश जाधव यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का बसला. तर सेवानिवृत्त शिक्षक बबनराव जाधव यांच्या पॅनलने अनपेक्षीतरित्या बहुमत मिळविले. सर्वात लक्षवेधी ठरलेल्या पणदरेच्या निवडणुकीत भैरवनाथ पॅनलने १५ पैकी १४ जागा जिंकून सिद्धेश्वर पॅनेलचा पराभव केला. मात्र, सरपंचपदाच्या निवडणुकीत सिद्धेश्वर पॅनेलच्या मीनाक्षी संभाजी जगताप या विजयी झाल्या. गडदरवाडी ग्रामपंचायतीमध्ये ३३ वर्षांनंतर राष्टÑवादीच्या गटाने विजय मिळवून सरपंचपद काबिज केले.
वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आंबामाता ग्रामविकास पॅनलने १३ पैकी सात जागा जिंंकल्या. मात्र, विरोधी अंबामाता परिवर्तन पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार नंदा राजकुमार सकुंडे या विजयी झाल्या. मासाळवाडीच्या निवडणुकीत बारामती बाजार समितीचे संचालक मुरलधीर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ नायकोबा बुवाजीबाबा जनसेवा विकास पॅनेलने सदस्यपदाच्या ८ पैकी ४ जागा जिंकल्या. मात्र, विरोधी गटाच्या भैरवनाथ पॅनलच्या भाग्यश्री सोमाजी ठोंबरे या सरपंचपदी विजयी झाल्या.

पणदरे : परस्पर विरोधी दावे

पक्षाचा प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग होता. गावपातळीवरील या निवडणुका होत्या. पणदरेच्या निवडुन आलेल्या सरपंच आमच्या पक्षाच्या विचाराच्या आहेत, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी हा दावा खोडून काढत १३ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेच वर्चस्व मिळविले आहे.
पणदरेच्या सरपंच राष्ट्रवादीच्याच विचारांच्या आहेत. त्यांनी मते मागताना छापलेल्या पत्रकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो होते. तसेच त्यांना या निवडणुकीत तेथील राष्ट्रवादी दिग्गज नेत्यांनी पाठबळ दिले. त्यामुळे त्या निवडून आल्या. त्यांच्या मुलाने गेल्या पाच वर्षांत उपसरपंच म्हणून काम पाहताना राष्ट्रवादीच्याच विचाराने काम पाहिले आहे, असे होळकर म्हणाले.

Web Title:  NCP's dominance in Baramati, proved to be incompetent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.