कॉँग्रेसच्या वाढलेल्या ताकदीची राष्ट्रवादीला डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 01:10 AM2019-04-06T01:10:11+5:302019-04-06T01:10:36+5:30

पुढील विधानसभा निवडणुकीची समीकरणे महत्त्वाची । आघाडी धर्माचे पालन होणार का, हाच प्रश्न

NCP's growing strength of Congress headache | कॉँग्रेसच्या वाढलेल्या ताकदीची राष्ट्रवादीला डोकेदुखी

कॉँग्रेसच्या वाढलेल्या ताकदीची राष्ट्रवादीला डोकेदुखी

Next

अविनाश थोरात 

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील कॉँग्रेसची ताकद कमी झाली होती. मात्र, कॉँग्रेसच्या शिलेदारांनी सातत्याने लढत देत ताकद वाढवत नेली. आघाडी झाली तरी राष्ट्रवादीपुढे हीच मोठी डोकेदुखी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघांत राष्टÑवादीचे आमदार आहेत. दौंडमध्ये भाजपा-शिवसेनेच्या आघाडीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे, तर भोरची जागा कॉँग्रेसकडे आहे. पुरंदरमध्ये शिवसेना तर खडकवासल्यात भाजपाचे आमदार आहेत.

कागदावर हे बळ दिसत असले तरी यंदाच्या चुरशीच्या लढतीमध्ये इंदापूर, पुरंदर आणि भोरमधून कॉँग्रेसची मदत महत्त्वाची आहे. या तीनही मतदारसंघांत कॉँग्रेसने २०१४ च्या निवडणुकीत कॉँग्रेसला ३५ ते ४० टक्के मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात कॉँग्रेस नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली आहे. भाजपानेही नाराज कॉँग्रेसची कुमक मिळविण्यासाठी रणनीती आखली आहे.
शिवसेनेबरोबर युती झाल्याने भाजपाला पुरंदर, भोरमधून मदत मिळणार आहे. पुरंदरमधून आमदार विजय शिवतारे आणि कॉँग्रेसचे संजय जगताप यांची लढाई लोकसभेतच पाहायला मिळणार आहे.

दौंडमध्ये २००९ मध्ये रमेश थोरात यांनी भाजपा-शिवसेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. २०१४ मध्ये त्यांच्या जागी राहुल कुल गेले आणि राष्टÑवादीकडून लढणाऱ्या थोरात यांचा त्यांनी पराभव केला. त्यामुळे दौंडमधील कुल-थोरात गटाच्या ताकदीची परीक्षाही
होणार आहे.
विधानसभेच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीने ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविली होती. लोकसभेसाठी ती ४८ टक्क्यांवर आली आहेत. ही बाब राष्टÑवादीची चिंता वाढविणारी आहे.

मतदारसंघाचा आतापर्यंतचा सूर
चित्र बदलेल का? कसे?
च्कॉँग्रेसच्या नेत्यांची समजूत घालण्यात राष्टÑवादीला यश मिळाले. कार्यकर्त्यांपर्यंत हा संदेश जाणार का, हा प्रश्न आहे.
च् गेल्या निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळूनही रासप किंवा भाजपने संपर्क ठेवला नाही. उमेदवार बदलल्याने हा मुद्दा मागे पडणार का?
च्राष्टÑीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी नाकारल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्यास भाजपला यश येणार का?

Web Title: NCP's growing strength of Congress headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.