राष्ट्रवादी अतिउत्साह पुणेकरांच्या अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:47+5:302021-06-20T04:09:47+5:30
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहता पुणे शहरातून कोरोना हद्दपार झाला आहे, असा समज राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष ...
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहता पुणे शहरातून कोरोना हद्दपार झाला आहे, असा समज राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा झालेला दिसतोय. ही गर्दी पाहून अजित पवारांना जाहीर माफी मागावी लागली. तसेच आयोजकांवर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे लागले, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय? राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी केलेल्या चुकीची शिक्षा पुणेकरांना भोगावी लागणार आहे.
नुकतीच दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, अद्यापही धोका टळलेला नाही. या काळात जमावबंदी लागू करण्यात आलेली असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमा कसे होतात, हा प्रश्न आहे. यामधून पुन्हा आजाराचा फैलाव झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न आहे. एकीकडे शासन ''तुम्ही खबरदारी घ्या. आम्ही जबाबदारी घेतो.'' असे नारे देत आहे. मात्र, दुसरीकडे मंत्रीच अशा प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. लग्न, तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक लोक जमा झाले तर कारवाई केली जाते. मग, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात झालेल्या गर्दीवरून पोलीस कारवाई करणार का, असा सवाल बिडकर यांनी उपस्थित केला.