‘घोडगंगा’त राष्ट्रवादीचीच सरशी

By admin | Published: May 13, 2015 02:48 AM2015-05-13T02:48:16+5:302015-05-13T02:48:16+5:30

भल्याभल्यांचे अंदाज खोटे ठरवत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पवार

NCP's Sarashi in 'Ghodganga' | ‘घोडगंगा’त राष्ट्रवादीचीच सरशी

‘घोडगंगा’त राष्ट्रवादीचीच सरशी

Next

शिरूर : भल्याभल्यांचे अंदाज खोटे ठरवत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागांवर आघाडी घेत घोडगंगाची सत्ता अबाधित राखण्यात यश मिळवले. या निवडणुकीत खुद्द आमदार बाबूराव पाचर्णे व अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या दादापाटील फराटे यांना पराभवाचा फटका बसला.
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागा जिंकण्याचा दावा आमदार बाबूराव पाचर्णे तसेच अ‍ॅड. अशोक पवार यांनी केला होता. पाचर्णे यांच्या प्रतिष्ठेची तर पवारांच्या अस्तित्वाची ही लढाई होती. यात पवारांनी बाजी मारली. पाचर्णे यांच्या जोडीला असलेल्या दादापाटील फराटे, मंगलदास बांदल, दूध संघाचे बाळासाहेब ढमढेरे यांनी या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पवार यांच्या पॅनेलला हद्दपार करण्याचा निर्धार केला होता. तसे वातावरण निर्माण करण्यात त्यांना यशही आले होते. जिल्हा बँकेचे संचालक निवृत्ती अण्णा गवारी यांनी नेहमीप्रमाणे आपले वजन पाचर्णेंच्या पॅनलच्या पारड्यात टाकले होते. यामुळे कोणता पॅनल निवडून येईल याबाबत ठाम असे कोणी सांगत नव्हते. दोन्ही पॅनेलप्रमुख मात्र आपापल्या विजयाचा दावा करीत होते.
आज सुरुवातीला ‘ब’ वर्गाचा निकाल जाहीर झाला. यात राष्ट्रवादीच्या सुदाम श्रीपती भुजबळ यांनी २४ पैकी १८ मते मिळवून विजय संपादन केला. अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाचा निकाल जाहीर झाला तेव्हा एकंदरीत मतदारांचा कौल स्पष्ट झाला. यात उत्तम सोनवणे (शेतकरी विकास पॅनल) यांनी ८२५१ मते मिळवत प्रतिस्पर्धी सहकार बचाव शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार शशिकांत वेताळ यांचा १५०१ मतांनी पराभव केला. वेताळ यांना ६७५० मते मिळाली.
महिला राखीव मतदारसंघातही शेतकरी विकास पॅनलच्या शालन काळे ८४४४ व मनीषा सोनवणे ८२०१ मते मिळवून विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी अनुक्रमे सुनंदा खंडागळे यांना ६७३०, तर लतिका वराळे यांना ६९३८ मते मिळाली. इतर मागासवर्गीय मतदारसंघात शेतकरी विकास पॅनलचे पोपट भुजबळ यांनी ८१३४ मते मिळवत प्रतिस्पर्धी दादा गदादे यांचा १५२८ मतांनी पराभव केला. गदादे यांना ६६०६ मते मिळाली.
भटक्या विमुक्त जाती
जमाती मतदारसंघात शेतकरी विकास पॅनलचे बीरा शेंडगे यांनी ८१९९ मते मिळवत प्रतिस्पर्धी आनंदा
लोखंडे (७०२२) यांचा ११७७ मतांनी पराभव केला.
यानंतर सर्वसाधारण मांडवगण फराटा मतदारसंघात निकाल
जाहीर करण्यात आला. यात दादापाटील फराटे यांना पराभव स्वीकारावा लागला. पाटील यांना ७५१६ मते मिळाली. त्यांच्या पॅनलमधील गोविंद फराटे यांना ७००३,
तर मदन फराटे यांना ६८१९ मते मिळाली. शेतकरी विकास पॅनलच्या बाबासाहेब फराटे यांना ७९२७, जगन्नाथ जगताप यांना ७९०१,
तर सुधीर फराटे यांना ७८९४ मते मिळाली. (वार्ताहर)

Web Title: NCP's Sarashi in 'Ghodganga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.