मलठणच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे शशिकला फुलसुंदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:08+5:302021-02-25T04:11:08+5:30
मलठण ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी निवडणूक झाली. सरपंच पदासाठी शशिकला नानाभाऊ फुलसुंदर व सोनाली संतोष गायकवाड यांनी, तर ...
मलठण ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी निवडणूक झाली. सरपंच पदासाठी शशिकला नानाभाऊ फुलसुंदर व सोनाली संतोष गायकवाड यांनी, तर उपसरपंच पदासाठी विनोद कदम व कविता मोहन चोरामले यांनी अर्ज दाखल केला. त्यामध्ये मतदान घेण्यात आले. सरपंच पदासाठी शशिकला फुलसुंदर यांना ११ तर सोनाली गायकवाड यांना अवघ्या एक मतावर समाधान मानावे लागले, तर एक मत बाद झाले. उपसरपंच पदासाठी विनोद कदम यांना ११ तर चोरमले यांना १ तर एक मत बाद झाले.
सरपंच शशिकला फुलसुंदर व उपसरपंच विनोद कदम यांचा सत्कार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, माजी सरपंच माधुरी थोरात, राणी नरवडे, पोपट साळवे, अनुसया कदम, दादासाहेब गावडे, किरण शिंदे, रामचंद्र गायकवाड, सोनाली दंडवते, सीमा कोळपे यांच्यासह माजी सरपंच विलास थोरात, शशिकांत वाव्हळ, शरद गिते, दत्तोबा दंडवते, मुकुंद नरवडे, आनंदराव गायकवाड, मिनिनाथ गिते, संदीप गायकवाड, पोलिस पाटील अर्चना थोरात, शंकर भुजबळ, बाळासाहेब दंडवते यांच्यासह मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते .
या वेळी नव निर्वाचित सरपंच शशिकला फुलसुंदर म्हणाल्या की, गावामध्ये शासनाच्या विविध योजना गावात राबविण्यासाठी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जातील.
फोटो : मलठणच्या सरपंचपदी शशिकला फुलसुंदर व उपसरपंचपदी विनोद कदम यांची निवड झाली.