राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांचा वैद्यकीय कारणास्तव केलेला जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:04 PM2020-04-06T17:04:36+5:302020-04-06T17:04:50+5:30
लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला 50 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी बांदल अटकेत..
पुणे : व्हिडीओ व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला 50 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांनी वैद्यकीय कारणास्तव केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यापूर्वी त्यांचा एकदा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
याप्रकरणी प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. बांदलसह आशिष हरिश्चंद्र पवार (वय-27), रूपशे ज्ञानोबा चौधरी (वय-45), रमेश रामचंद्र पवार (वय-32), संदेश वाडेकर यांनी अटक करण्यात आली होेती.संदेश वाडकर आणि रुपेश चौधरी या दोघांचा या गुन्हयात जामीन फेटाळण्यात आला आहे. फिर्यादीच्या वतीने अॅड.पुष्कर दुर्गे काम पाहत आहेत.
बांदल यांनी फिर्यादी सराफाला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी रुपेश चौधरी सोबत होता. बांदल यांनी सराफाला तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्या वतीने काम पाहील, अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावाने सराफाकडे खंडणीची मागणी करत होता. या प्रकरणी पोलिसांनी बांदल यांना अटक केली आहे. पोलीस कोठडीत असताना तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर बचाव पक्षाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा, असा अर्ज न्यायालयात केला. या अर्जास सहाय्यक सरकारी वकील गौरी कदम यांनी विरोध केला. या प्रकरणात या पूर्वी दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. बांदल हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना जामीन देणे योग्य नसून, येरवडा कारागृहात वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळवा, अशी मागणी ?ड. कदम यांनी केली फियार्दीच्या वतीने ?ड.पुष्कर दुर्गे यांनी काम पाहत आहेत.