चौथ्या श्रावणी सोमवारी सुमारे दीड लाख भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:10 AM2017-08-15T00:10:50+5:302017-08-15T00:10:52+5:30
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी सुमारे दीड लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.
भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी सुमारे दीड लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. आजच्या सोमवारच्या तुलनेत शनिवार व रविवारी जास्त गर्दी होती. दरम्यान, आज राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकरचे दर्शन घेतले.
दाट धुके, पावसाच्या कोसळणाºया सरी यामध्ये दर्शनरांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. दर्शनासाठी सुमारे तीन तास लागत होते. तसेच मुखदर्शन व पासद्वारे दर्शनाची देवस्थानने व्यवस्था केली होती. यालादेखील मोठी गर्दी झाली होती. चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काम करत होते. दर्शन लवकर व्हावे यासाठी देवस्थानच्या पुजाºयांनी प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरातील अभिषेक बंद ठेवले होते.
भीमाशंकरकडे येणारे मंचर-भीमाशंकर व राजगुरूनगर-भीमाशंकर हे दोन्ही रस्ते सध्या भरून वाहत आहेत.