नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:40 AM2018-04-14T00:40:22+5:302018-04-14T00:40:22+5:30

विशेष मुलाला लागणाऱ्या सुविधा व शिक्षक न पुरवता त्याचा मानसिक व भावनात्मक छळ केल्याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्तांसह नऊ जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

Necessary refusal of nine people rejected | नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next

पुणे : विशेष मुलाला लागणाऱ्या सुविधा व शिक्षक न पुरवता त्याचा मानसिक व भावनात्मक छळ केल्याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्तांसह नऊ जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी हा आदेश दिला.
शाळेचे विश्वस्त संदीप चंद्रप्रकाश गोयंका (वय ५०, मुंबई), अर्चना संदीप गोयंका (वय ४७), शिक्षक मेघा अविनाश दोडेजा (वय ४३), माजी मुख्याध्यापिका शेफाली तिवारी (वय ४४, विमाननगर), रिमा संजय खुराणा (वय ४६, रा. शंकरशेठ रोड), निशा निरंजनकुमार शहा (वय ३२, भवानी पेठ), पूजा भल्ला (वय ४०, कोंढवा), सचिन महादेव चव्हाण (वय २९, घाटेवाडी) व लिनाझ सरोश सोनावाला (रा. कॅशिया बिल्डिंग, झिरकॉन को- आॅप. हाऊसिंग सोसायटी विमाननगर) अशा ९ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. ११ एप्रिल ते २७ सप्टेंबरदरम्यान हा सर्व प्रकार घडला.
फिर्यादी यांचा ७ वर्षांचा मुलगा विशेष आहे. त्यांनी प्रवेश घेतेवेळी मुलाबाबत माहिती दिली होती. त्या वेळी शाळेने त्याच्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यासोबतच वेगळे शिक्षक व मानसोपचारतज्ज्ञाचीही मदत घेतली जाते, असे सांगितले. मात्र, मुलाला विशेष सुविधा न देता त्याचा मानसिक व भावनात्मक छळ केला. एक व्यक्ती म्हणून जीवन जगण्याच्या मानमर्यादेच्या अधिकारापासून वंचित केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिक्षण हक्क कायद्यासह इतर कलमान्वये देखील गुन्हा दाखल केला आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, गुन्ह्याचा तपास होण्याची आवश्यकता असल्याने अतिरिक्त सरकारी वकील एस. एम. जगताप यांनी नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

Web Title: Necessary refusal of nine people rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.