E-bikes: ई-बाइक हवी, तर तीन महिने थांबा; इंधनाच्या वाढत्या दरामुळे पुणेकरांची ई-बाईकला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 01:37 PM2022-03-17T13:37:20+5:302022-03-17T13:38:14+5:30

पुणे : इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य पुणेकर ई-वाहनाच्या खरेदीला अधिक प्राधान्य देत आहे. मात्र, वाढती ई-वाहनांच्या मागणीमुळे बाजारात ई-वाहनांसाठी ...

Need an e-bike, wait three months; | E-bikes: ई-बाइक हवी, तर तीन महिने थांबा; इंधनाच्या वाढत्या दरामुळे पुणेकरांची ई-बाईकला पसंती

E-bikes: ई-बाइक हवी, तर तीन महिने थांबा; इंधनाच्या वाढत्या दरामुळे पुणेकरांची ई-बाईकला पसंती

Next

पुणे : इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य पुणेकर ई-वाहनाच्या खरेदीला अधिक प्राधान्य देत आहे. मात्र, वाढती ई-वाहनांच्या मागणीमुळे बाजारात ई-वाहनांसाठी वेटिंग सुरू आहे. दुचाकीला तीन महिने, तर चारचाकीला सहा महिन्यांचे वेटिंग आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही ई-वाहन घ्यायचं असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे अनेक वाहनधारक ई-वाहने खरेदीस प्राधान्य देत आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. परिणामी बाजारात ई-वाहनांना मोठा वेटिंग कालावधी निर्माण झाला आहे. पुण्यातदेखील हीच परिस्थिती आहे. पुण्यात ई-बाइकसाठी तीन महिने व चारचाकीला किमान सहा ते सात महिन्यांचे वेटिंग आहे.

जिल्ह्यातील ई-वाहने :

पुणे आरटीओ कार्यालयात जवळपास 8 हजार ई-वाहनांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक संख्या दुचाकीची आहे. पुण्यात दुचाकीची संख्या जवळपास सहा हजारहून अधिक आहे, तर चारचाकीची संख्या 1 हजारहून अधिक आहे. ई-रिक्षा, बस, माल वाहतूक रिक्षा आदींचा समावेश आहे.

चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविणे गरजेचे :

पुण्यात जवळपास चाळीस ते पन्नास ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स आहेत. मात्र, ही संख्या वाहनांच्या तुलनेने कमी आहे. केवळ चार्जिंगची सोय नसल्याने अनेक जण ई-वाहने घेण्यास तयार नाहीत. चार्जिंग स्टेशनवर वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यासाठीदेखील वाहनधारकांना थांबावे लागते. त्यामुळे चार्जिंग स्टेशन वाढविणे गरजेचे आहे.

''मी गेल्या काही महिन्यांपासून ई-बाइक वापरत आहे. त्यामुळे मला आता पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराची चिंता नाही. शिवाय ई-बाइक ही पर्यावरणपूरक असल्याचाही आनंद आहे असे संतोष कोठावळे ई-वाहनधारक यांनी सांगितले.'' 

Web Title: Need an e-bike, wait three months;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.