बालकांच्या समस्या निराकरणासाठी बालसमुपदेशकांची गरज : डॉ. राजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:18+5:302021-05-31T04:08:18+5:30
पुणे : देशातील मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षितांचे प्रमाण हे आपल्याकडील मानसिक रुग्णांच्या तुलनेत अतिशय तोकडे आहे. अलीकडील ...
पुणे : देशातील मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षितांचे प्रमाण हे आपल्याकडील मानसिक रुग्णांच्या तुलनेत अतिशय तोकडे आहे. अलीकडील काळात बालकांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बालकांच्या विविध समस्यांवर समुपदेशन करणारे प्रशिक्षित बालसमुपदेशक हे मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावेत, असे मत वर्ल्ड सायकियाट्रिक असोसिएशनचे प्रतिनिधी, असोशिएशन ऑफ इंडस्ट्रियल सायकियाट्रीचे विद्यमान अध्यक्ष (ब्रिगेडियर) डॉ. एम. एस. व्ही. के. राजू यांनी व्यक्त केले.
कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन अभ्यासक्रमाच्या पदवीदान समारंभ झाला. एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या माजी मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मेधा कुमठेकर, विनायक घोरपडे, प्रसाद कोल्हटकर, डॉ. महेश ठाकूर व प्रा. चेतन दिवाण उपस्थित होते.
समुपदेशक हा कसा असावा आणि त्याने समुपदेशन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी समुपदेशन क्षेत्रामध्ये प्रवेश करीत असलेल्या नूतन समुपदेशकांना डॉ. मेधा कुमठेकर यांनी मार्गदर्शन केले.