सायबर सुरक्षा काळाची गरज : हॅरल्ड डिकोस्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:37 PM2018-05-07T18:37:02+5:302018-05-07T18:37:02+5:30

वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडतात. त्यामुळे सायबर सुरक्षा काळाची गरज बनली आहे.

Need for Cyber ​​Security: Hyarld Dicosta | सायबर सुरक्षा काळाची गरज : हॅरल्ड डिकोस्टा

सायबर सुरक्षा काळाची गरज : हॅरल्ड डिकोस्टा

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘वाढती गुन्हेगारी’ विषयावर व्याख्यानआपली कोणतीही वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकू नका

पुणे : भारतात कोट्यवधी लोक इंटरनेटचा वापर करतात. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅपवर आपण वैयक्तिक माहिती टाकत असतो. परंतु, ही माहिती कोणत्या सर्व्हरमध्ये जतन केली जात आहे, याबद्दल आपल्याला माहिती नसते. वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडतात. त्यामुळे सायबर सुरक्षा काळाची गरज बनली आहे. स्वच्छ भारतप्रमाणे स्वच्छ इंटरनेट सेवा देखील आपल्याला मिळायला हवी, असे मत सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ हॅरल्ड डिकॉस्टा यांनी व्यक्त केले. 
आॅल इंडिया अ‍ॅन्टी करप्शन, क्राईम प्रिव्हेंटिव्ह अँड ह्युमन राईट्स कमिटी पुणे शहर व जिल्हातर्फे ‘सायबर क्राईम आणि वाढती गुन्हेगारी’ याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र कडू, स्वप्निल खडके, सचिन फोलाने, नितीन गावडे, धीरज अरगडे, निलेश डहाळे, आयोजक मकरंद कलबुर्गी आदी उपस्थित होते. 
डिकॉस्टा म्हणाले, ‘इंटरनेटवरून आपण मोबाईलमध्ये विविध अ‍ॅप डाऊनलोड करतो. परंतु, डाऊनलोड करताना त्याच्या नियम व अटी वाचत नाही. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅॅपचा सर्व्हर अमेरिकेत असून तुमची सगळी माहिती त्यांच्याकडे जतन होते. त्यामुळे आपल्या माहितीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी.’ 
ते म्हणाले, ‘आपली कोणतीही वैयक्तिक माहिती इंटरनेटवर टाकू नका. आपली गोपनीय माहिती मेसेजच्या माध्यमातून पाठवू नका. मोबाईल, लॅपटॉप स्वत: खरेदी केलेलेच वापरा. आपला मोबाईल, लॅपटॉप, क्रेडीट-डेबीट कार्ड स्वत:जवळ ठेवा. रात्रीच्या वेळेत मोबाईलमधील इंटरनेट बंद ठेवा. कारण यावेळेमध्ये अधिक गुन्हे घडण्याची शक्यता असते. ग्रामीण भागातील लोकांनाही याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.’  

Web Title: Need for Cyber ​​Security: Hyarld Dicosta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.