शहरी भागात वनांचा विकास होणे गरजेचे : ॲड. वंदना चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:08+5:302021-01-18T04:10:08+5:30
खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या युथ कनेक्ट व वसुंधरा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. चंद्रकांत ...
खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या युथ कनेक्ट व वसुंधरा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. चंद्रकांत बबनराव गारुडकर विविध जैवता उद्यान, बाणेर तुकाई टेकडी येथे वृक्षारोपण व टेकडीवरील वृक्षसंवर्धन कार्यक्रमाची माहिती घेण्यास संदर्भात भेट दिली.
बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंत गायकवाड, नगरसेवक बाबूराव चांदेरे, पांडुरंग भुजबळ, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, विनायक हनमघर, डॉ. सुनील जगताप, स्वप्नील दुधाने, नितीन कळमकर, महेश हांडे, अश्विनी परेरा, सनी मानकर, विशाल मोरे, शुभम मातळे, सुषमा सातपुते, गणेश नलावडे, राकेश कामठे, रवी घाटे उपस्थित होते.
तरुणांना वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून चालू आसलेल्या वृक्षलागवड व संगोपन यांची माहिती व्हावी, या उद्देशाने ही भेट आयोजित केली होती.
वसुंधरा अभियानाचे पांडुरंग भुजबळ व त्यांचे सहकाऱ्यांनी तरुणांना विविध वृक्षाची व टेकडीवर चालू असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली.
फोटो - बाणेर तुकाई टेकडी येथे वृक्षारोपण व टेकडीवरील वृक्षसंवर्धन कार्यक्रमप्रसंगी उपस्थित खासदार वंदना चव्हाण, हणमंत गायकवाड व इतर मान्यवर.