विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:17+5:302021-02-09T04:12:17+5:30
पुणे : “सामाजिक संस्थांनी सामाजिक भूमिकेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून एका जबादार पालकाची भूमिका पार पाडली ...
पुणे : “सामाजिक संस्थांनी सामाजिक भूमिकेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून एका जबादार पालकाची भूमिका पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे,” असे मत राज्याचे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी व्यक्त केले.
शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमात झेंडे बोलत होते. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, अनिल शिंदे, विक्रमसिंह लावंड, नितीन साळुंके, सागर शेंडगे, रामचंद्र चोरगे, एस. एम. गिरमकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शंभर विद्यार्थ्यांना प्राप्तिकर उपायुक्त रत्नाकर शेळके, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्य करणाऱ्या डोणजे येथील ‘आपलं घर’ या संस्थेला ‘शिवसह्याद्री विशेष सन्मान’ पुरस्काने गौरविण्यात आले. कोंढरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अभिषेक मोहोळ यांनी केले. सुधा पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. विश्वस्त नितीन साळुंके यांनी आभार मानले.
-----------
फोटो आहे.