पुरोगामी विचार लोकांमध्ये नव्याने रुजवण्याची गरज : जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:23+5:302021-08-18T04:15:23+5:30

पुणे जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांतील व्यक्तींचा सन्मान ...

Need to inculcate progressive thinking in people: Jagtap | पुरोगामी विचार लोकांमध्ये नव्याने रुजवण्याची गरज : जगताप

पुरोगामी विचार लोकांमध्ये नव्याने रुजवण्याची गरज : जगताप

Next

पुणे जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांतील व्यक्तींचा सन्मान सत्कार कार्यक्रम राजगुरूनगर येथे आनंदी आनंद मंगल कार्यालयात झाला. अध्यक्षस्थानी माजी खासदार अशोक मोहोळ होते. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, माजी जिल्हा अध्यक्ष देविदास भन्साळी, सरचिटणीस भास्कर तुळवे, भीमशक्ती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष तथा खेड तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष विजय डोळस, जि.प. सदस्य दत्ता डुरंगे, खेड पंसचे माजी उपसभापती अमोल पवार, युवक अध्यक्ष सोमनाथ दौंडकर, सासवडचे शहर अध्यक्ष बाळासाहेब पायगुडे, नंदू जगताप, महेश ढमढेरे, डॉ. संतोष होगले, मावळ तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, महिला जिल्हा अध्यक्षा वंदना सातपुते, लोणावळा शहर काँग्रेस अध्यक्ष प्रमोद गायकवाड, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, पं.स. माजी सदस्य किरण आहेर, हिरामण सातकर, दिनेश ओसवाल, वंदना सातपुते, गीताबाई मांडेकर, जाकीर अन्सारी यांच्यासह माजी सैनिक, सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्ती, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेड तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक परिवाराचा सन्मान करताना आमदार संजय जगताप, माजी खासदार अशोक मोहोळ, देवीदास भन्साळी व मान्यवर.

Web Title: Need to inculcate progressive thinking in people: Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.