तंत्रज्ञानाची माहिती हवीच : अतुल लिमये
By Admin | Published: February 19, 2016 01:38 AM2016-02-19T01:38:01+5:302016-02-19T01:38:01+5:30
भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अँंड्रॉइड’ याविषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे : भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अँंड्रॉइड’ याविषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन व्हेलॉसिटी सोल्यूशन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक अतुल लिमये यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. डी. के. जाधव उपस्थित होते.
लिमये म्हणाले, आजच्या आधुनिक युगात संगणक तंत्रज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजचा संगणक उद्या कितीतरी बदललेल्या अवस्थेत असेल, ही दृष्टी ठेवून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. आयटीमधील संधी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, स्मार्ट डिव्हायसेस ही सध्याची गरज आहे. या वेळी लिमये यांच्या हस्ते टेक ट्रिक्स- २०१५ या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रास्ताविकामध्ये डॉ. के. डी. जाधव यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक प्रगती आणि संशोधन पूरक उपक्रमांचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच अँंड्राइडचे दैनंदिन जीवनातील महत्त्व व त्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञानातील नवीन विषय विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असे नमूद केले. कार्यशाळेमध्ये सीईओ बिट कोड टेक्नॉलॉजी प्रा.लि.च्या विशाल जगताप यांनी अँंड्राइड, आर्किटेक्चर, अॅप्लिकेशन्सच्या अनुषंगाने इंटरनेटवर प्रात्यक्षिके घेतली.