तंत्रज्ञान वापराबरोबर संवाद ठेवण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:57+5:302021-09-18T04:11:57+5:30
नसरापूर : नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे; परंतु, विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत मोबाईलशी खूपच जवळीक साधली आहे. त्यातूनच ...
नसरापूर : नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे; परंतु, विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत मोबाईलशी खूपच जवळीक साधली आहे. त्यातूनच त्यांचा समाज आणि कुटुंबाशी विसंवाद वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच संवाद ठेवण्याचीही गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केले.
नसरापूर (ता. भोर) येथील ज्ञानप्रकाश शिक्षण संस्थेच्या माळेगाव येथील व्ही. एम. आठवले विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप व नवीन सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने रणजित शिवतरे उपस्थित होते. यावेळी भोरचे उपसभापती लहू शेलार, माळेगावचे सरपंच अमोल मोरे, उपसरपंच विकास निगडे, प्रा. प्रफुल्ल पेंढारकर, मेधा पेंढारकर, देगावचे सरपंच शिवाजी यादव, सोपान मोहिते, माउली झेंडे, अशोक शेडगे, सुमती कोठारी, शिवाजी दिघे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. शाम दलाल, उपाध्यक्ष काशीनाथ पालकर, सचिव अशोक शेलार, संचालक हनुमंत कदम, डॉ. गणेश हिवरेकर, भिकोबा हाडके, राजू चव्हाण, प्रशांत पोरे, ज्ञानेश्वर झेंडे, अशोक भोरडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेवती पवार, विक्रम कदम आणि शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
पुणे - बाणेर येथील भगवती आश्रम ट्रस्ट यांच्या वतीने दहा गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या इमारतीसाठी शैलजा पेंढारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाच लाखांची मदत करणाऱ्या प्रा. प्रफुल्ल पेंढारकर व मेधा पेंढारकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रणजित शिवतरे म्हणाले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या आराखड्यात नसरापूर हे एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. व्ही. एम. आठवले विद्यालय ही एक दर्जेदार शिक्षण देणारी शाळा असा तिचा नावलौकिक आहे. अनेक मान्यवरांनी शाळेला मदत केली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने दर्जेदार क्रीडासाहित्य, स्वच्छता बांधकामासाठी मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. डॉ. शाम दलाल यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीची माहिती दिली.
१७ नसरापूर सायकल वाटप
सायकल वाटपप्रसंगी रणजित शिवतरे, डॉ. शाम दलाल व इतर उपस्थित होते.
170921\img_20210911_120623.jpg
???? ???? ? ?? : ???????- ???????( ??.???) ????? ???? ?? ????? ???????????? ???? ??????????????? ???? ????? ???? ?????? ????????? ????? ??????,??.??? ???? ??? ???????? ? ???????? ?????????.