ज्ञानभक्तीचा प्रसार होणो आवश्यक
By admin | Published: November 23, 2014 12:08 AM2014-11-23T00:08:48+5:302014-11-23T00:08:48+5:30
संतमांदियाळीत ज्ञानोबा, तुकोबा यांबरोबरच सावतामहाराज, चोखोबा, गुरुनानक, कबीर, सूरदास यांसारख्या संतांचाही समावेश होतो,
Next
पुणो : संतमांदियाळीत ज्ञानोबा, तुकोबा यांबरोबरच सावतामहाराज, चोखोबा, गुरुनानक, कबीर, सूरदास यांसारख्या संतांचाही समावेश होतो, मात्र या संतांच्या रचना महाराष्ट्रात विशेष गायल्या जात नाहीत. त्यामुळे या संतांच्या पारंपरिक रचना संगीतबद्ध करून त्यामधील भावार्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. संगीताबरोबरच ज्ञानभक्तीचा अधिकाधिक प्रसार होणो महत्त्वपूर्ण असल्याचे किराणा घराण्याचे गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांनी सांगितले.
संगीतोन्मेष संस्थेच्या वतीने पं. यादवराज फड यांनी संगीतबद्ध केलेल्या पारंपरिक रचनांवर आधारित ‘भक्ती-स्वरगंध’ या कार्यक्रमाची 1000 मैफल उद्या विधी महाविद्यालय रस्त्यावरील फिल्म इन्स्टिटय़ूटच्या सभागृहात होत आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला.
भक्तिसंगीतामध्ये ‘भाव’ अत्यंत महत्त्वाचा आहे. गायकीत जोर्पयत भाव उतरत नाहीत तोर्पयत ते संगीत रुक्ष वाटते. भावहीन संगीत मनाला नाहीतर बुद्धीला आनंद देऊ शकते, असे सांगून फड म्हणाले, की श्रोत्यांना कोणत्या भावाद्वारे सांगायचे आहे, त्या रचनांमधील आशय काय आहे, याचा विचार करून संगीत देण्याचा प्रयत्न मी केला आहे. कारण भावभक्ती अंगात भिनल्याशिवाय ‘ज्ञानाची’ प्रचिती येत नाही.
सामान्यांपासून विद्वानांर्पयत भक्तिभाव पोहोचविणो हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या अनुभूतीमधून ‘पांडुरंग भेटवलासी’ अशी अवस्था रसिकजनांची झाल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच ‘संगीतापेक्षा’ही सावतामहाराज, चोखोबा, संत कबीर, सूरदास, मीराबाई यांसारख्या संतमांदियाळीतील संतांच्या रचनांमधील भावार्थ उलगडून दाखविण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. या 1क्क्क्व्या मैफलीत पारंपरिक ‘पंचपदी’चा समावेश असणार आहे.
ईशस्तवन, ‘जय जय रामकृष्ण हरी’ बीजमंत्र, रूप, ध्यान आणि ‘जय जय विठ्ठल’चा जयघोष केला जाणार आहे. दैवतांच्या रचना सादर करून त्यांची आराधना करणो हे त्यामागील प्रयोजन आहे. (प्रतिनिधी)
घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत यंदाचे 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र या संमेलनात वारकरी संप्रदायाचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. संमेलनाला सन्मानाने बोलाविले तरच जाणार आहे. कारण वादक, गायक यांना एवढय़ा लांब एकत्रितपणो घेऊन जाणो शक्य नाही. - पं. यादवराज फड