अंजीरासाठी संशोधन गरजेचे - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 02:57 AM2018-01-29T02:57:06+5:302018-01-29T02:57:49+5:30
अंजिराच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत. परदेशातील अंजीर साठवण क्षमतेत जास्त काळ टिकतो तसाच आपला अंजीर टिकला पाहिजे. हे फळ जास्त काळ कसे टिकेल, यावर प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील तसेच बाजारभाव मिळण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
गराडे - अंजिराच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत. परदेशातील अंजीर साठवण क्षमतेत जास्त काळ टिकतो तसाच आपला अंजीर टिकला पाहिजे. हे फळ जास्त काळ कसे टिकेल, यावर प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील तसेच बाजारभाव मिळण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
काळेवाडी (ता. पुरंदर) येथे अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ, पुणे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आदींचे संयुक्त विद्यमाने रविवारी अंजीर परिषदेचे उद्घाटन व अंजीररत्न पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे हे होते.
यावेळी माजी कृषिमंत्री दादासाहेब जाधवराव, माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राज्य कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप यादव, सुदामराव इंगळे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सभापती अतुल म्हस्के, संभाजी झेंडे, शिवाजी पोमण, सतीश उरसळ, तहसीलदार सचिन गिरी, प्रकल्प संचालक सुनील बोरकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताठे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे आदी उपस्थित होते.
पाणी येत असेल व त्यात काही अडचणी येत असतील तर सर्वांनी एकत्र बसून आपण त्या सोडविल्या पाहिजेत. तसेच विमानतळ होण्यामुळे भविष्यात या परिसरात बºयाच मोठ्या प्रमाणावर सुधारणा होतील. तेव्हा लोकांनी सामंजस्य व विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.
या वेळी सीताराम देशमुख (परभणी), अरुण देवरे (नासिक), समीर डोंबे (दौंड), समीर काळे, संभाजी पवार व महादेव खेडेकर (पुरंदर), दीपक जगताप (बारामती), महादेव गोगावले व अरुण घुले (हवेली) यांना अंजीर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले. तर डॉ. विकास खैरे यांना अंजीर संशोधनातील शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात आला. सौरभ कुंजीर व रोहन उरसळ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
राज्य अंजीर संघाचे अध्यक्ष रवींद्र नवलाखा, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिन सुरेश सस्ते, खजिनदार
प्रदीप पोमण, जलमित्र सागर काळे, दिलीप जाधव, सुशिल जाधव आदींसह परिषदेच्या संचालक
मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन
केले. प्रास्ताविक सुरेश सस्ते यांनी केले. सूत्रसंचालन संजय पोमण यांनी केले. तर आभार प्रदीप पोमण यांनी मानले.
अंजिरातील अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी कृषिमंत्री व संबंधित अधिकारी यांच्या बैठकीचे भविष्यात आयोजन केले जाईल. गुंजणीच्या पाइपलाइनचे टेंडर लवकरच निघेल. तालुक्यातील इतर भागाला पुरंदर उपशाचे पाणी मिळविण्यासाठी अधिकाºयांची बैठक घेतली जाईल.
- विजय शिवतारे, आमदार