सकारात्मकता हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:10 AM2021-04-25T04:10:57+5:302021-04-25T04:10:57+5:30
* म्हणूनच अशा रुग्णांना एका खोलीत ठेवावे. तिथे बाहेरून येणाऱ्यांनी स्वच्छ झाल्याशिवाय मुळीच जाऊ नये. * तरुण मुले किंवा ...
* म्हणूनच अशा रुग्णांना एका खोलीत ठेवावे. तिथे बाहेरून येणाऱ्यांनी स्वच्छ झाल्याशिवाय मुळीच जाऊ नये.
* तरुण मुले किंवा बाहेरून येणाऱ्या कोणाकडूनही यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घेतलीच पाहिजे.
* तरीही कोरोना झालाच तर औषधे आहेतच, पण माझा अनुभव असे सांगतो की, या रुग्णांचे मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे.
* माझ्या माहितीतील एका ९० वर्षांच्या महिलेने मनशक्तीच्या जोरावर नियमित औषधे घेऊन कोरोनावर मात केली.
* आपल्या प्रत्येकाच्या शरीरात विशिष्ट ग्रंथींमधून मनातील बऱ्यावाईट विचारांनुसार अंत:स्राव पाझरत असतात. सकारात्मक विचार केले तर त्यामुळे पाझरणाऱ्या अंत:स्रावाचा अगदी निश्चित परिणाम होतो.
* हा परिणाम म्हणजे काय तर औषधांचा गुण लागू पडतो व आजार लवकर बरा व्हायला सुरुवात होते. माझ्या म्हणण्याला शास्त्रीय आधार आहे.
* याशिवाय तीव्र इच्छाशक्तीही आजारावर निश्चितपणे मात करते. मी बरा होणार आहे हा विचार मनात सतत ठेवायला हवा.
* रुग्णाबरोबरच त्याच्या नातेवाइकांवरही याची जबाबदारी असते. रुग्णाचे मनोबल टिकवणे, ते वाढण्यासाठी प्रयत्न करणे, शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्याचे मानसिक आरोग्य जपणेही या काळात आवश्यक असते.
* कोरोना महामारी आहे, एक मोठा प्रकोप आहे; पण मानवी इच्छाशक्ती त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे कोरोनावर निश्चितपणे मात होणार आहे ही खात्री प्रत्येकाने बाळगायला हवी.
डॉ. कल्याण गंगवाल, कन्सल्टिंग फिजिशियन, केईएम व पूना हॉस्पिटल