किटकजन्य आजार रोखण्यासाठी लोकसहभागाची गरज, हिवताप नियंत्रण केंद्राकडून घरटी सर्व्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:17 PM2020-06-15T16:17:45+5:302020-06-15T16:37:25+5:30
बारामती तालुक्यात हिवताप नियंत्रण केंद्राकडून घरटी थंडीतापाच्या रूग्णांचे सर्व्हेक्षण
रविकिरण सासवडे
बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किटकजन्य आजार रोखण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात लोकसहभागाची गरज असणार आहे. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यात हिवताप नियंत्रण केंद्राकडून घरटी थंडीतापाच्या रूग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. तसेच मार्च महिन्यापासून ९ हजार ८६५ रूग्णांच्या रक्तांचे नमुने देखील तपासण्यात आलेआहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतर कोरोनासोबतच किटकजन्य आजाराच्या बाबत देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गतअसणाºया हिवताप नियंत्रण केंद्राच्या माध्यमातून वर्षभर किटकजन्यआजारांचे सर्व्हेक्षण सुरू असते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणेयांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर हिवताप नियंत्रण केंद्राचे आरोग्य सेवक, आरोग्य सहायक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींच्या माध्यमातून कोरोनासोबत किटकजन्य आजाराचे सर्व्हेक्षण सुरू केले. त्यासाठी आरोग्य कर्मचाच्या माध्यमातून थंडीतापांच्या रूग्णांची घरटी तपासणी करण्यात आली. यामध्ये आवश्यक रूग्णांच्या रक्ताचे नमुणे देखील तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. जानेवारी २०२० पासून बारामती तालुक्यात हिवतापाचा रूग्ण अढळलेला नाही.
मागील वर्षात बारामती तालुक्यात हिवतापाचे ७ रूग्ण अढळून आले होते.तालुक्यामध्ये दरवर्षी डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया आदी विषाणूजन्य आजाराच्या साथी कमी जास्त प्रमाणात पसरतात. यंदा कोरोना साथीमुळे आरोग्ययंत्रणेवर ताण आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक,आरोग्य सेवक आदींच्या माध्यमातून लोकसहभागातून गावागावात जनजागृतीवर भरदेण्यात येत आहे. यासाठी हिवताप नियंत्रण केंद्राकडून ग्रामस्थांसाठी माहितीपत्रकाचे घरटी वाटप करण्यात येत आहे. घर परिसरात डासांची पैदास होणार नाही यासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य सहायक एस. एन. शिंगाडे यांनी दिली.
....................
ग्रामस्थांनी परिसर स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे. आपल्या परिसरात पावसाचे अनावश्क पाणी साठू न दिल्यास डासांची पैदास होणार नाही. परिणामीआजारांना रोखण्यात मदत होईल.
- सुभाष गायकवाड, आरोग्य पर्यवेक्षक, हिवताप नियंत्रण केंद्र बारामती
................................................
ग्रामस्थांनी घ्यावयाची दक्षता...
- डेंग्यू, चिकण गुनियाची लक्षणे अढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी.
- कोरडा दिवस पाळावा
- घर परिसरातील निरूपयोगी वस्तू नष्ट कराव्यात
-डासांपासून वैयक्तीक सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
- आवश्यक तेथे पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत.
-डास निमुर्लनासाठी सामुहिक प्रयत्न करावेत.
.........................................................
हिवताप नियंत्रण केंद्राने केलेले घरटी
सर्व्हेक्षण (मार्च महिन्यापासून )
महिना घरे लारवा इंडेक्स
मार्च १६,०७४ २११ १.३१ टक्के
एप्रिल १६,८९५ १६१ ०.९५ टक्के
मे १७,६९६ १६७ ०.९४ टक्के
थंडीतापाच्या रूग्णांचे तपासलेले रक्त नमुणे
महिना अॅक्टीव्ह पॅसिव्ह
मार्च २,८२६ ३,१५५
एप्रिल ५७२ १,२१६
मे ९३४ १,१६२
-----------------------------