शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची गरज - अरुण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 03:23 PM2017-12-17T15:23:10+5:302017-12-17T15:23:23+5:30
लोकसंख्या हे भारताचे बलस्थान आहे. यास चांगले शिक्षण देऊन जागतिक अर्थव्यवस्थाना भारत मनुष्यबळ पुरवू शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
पुणे : लोकसंख्या हे भारताचे बलस्थान आहे. यास चांगले शिक्षण देऊन जागतिक अर्थव्यवस्थाना भारत मनुष्यबळ पुरवू शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला जेटली प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ उदयोगपती राहूल बजाज, बोस्टन विद्यापीठातील प्रा. फिलिप अल्टबॅक यांना विद्यापीठाकडून डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. कुलपती शां. ब. मुजूमदार, उपकुलपती विद्या येरवडेकर, कुलगुरू रजनी गुप्ते उपस्थित होते.
अरुण जेटली म्हणाले, "शिक्षण आणि न्याय व्यवस्थेत सुधारणेसाठी भारत प्रयत्न करतो आहे. त्यासाठी रोडमॅप तयार करण्याची गरज आहे. शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले गेले पाहिजे."
सध्या स्पर्धात्मक युग असल्याने गुणवत्तेला महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थीनी शिक्षणात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत."
शां. ब. मुजूमदार यांनी खाजगी विद्यापीठाच्या नावात अभिमत शब्द लावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.